भारत-चीन गलवान संघर्ष; रशियन वृत्तसंस्थेने केला मोठा दावा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, February 11, 2021

भारत-चीन गलवान संघर्ष; रशियन वृत्तसंस्थेने केला मोठा दावा

https://ift.tt/3tPqNlC
मॉस्को/बीजिंग: मागील वर्षी १५ जून रोजी भारत आणि चीनच्या सैन्यात लडाखमधील गलवान खोऱ्यात हिंसक संषर्घ झाला होता. या हिंसक संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले होते. तर, चीनने त्यांच्या ठार झालेल्या सैनिकांबाबत अवाक्षरही काढले नव्हते. मात्र, रशियन वृत्तसंस्था TASSने याबाबत खुलासा केला असून चीनचे ४५ सेन्य ठार झाले असल्याची माहिती दिली आहे. मागील वर्षी एप्रिल-मे महिन्यात लडाखमध्ये चिनी सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून भारताच्या हद्दीत घुसखोरी केली होती. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला होता. गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैन्यात संघर्ष झाला. या संघर्षात २० भारतीय जवान ठार झाले. चिनी सैन्याचीही जीवितहानी झाली असल्याचे भारतीय अधिकाऱ्यांनी म्हटले होते. मात्र, चीनने हा दावा फेटाळून लावला. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये लष्करी स्तरावर चर्चा सुरू झाली. त्यावेळी एका बैठकीत चीनने ५ जवान ठार झाले असल्याची कबुली दिली होती. यामध्ये त्यांच्या एका कमांडिंग ऑफिसरचाही समावेश होता. वाचा: रेजांग ला आणि रेचिन लामध्येही सैन्य आमने-सामने लडाखच्या डेपसांग, पँन्गाँग सरोवरावरील दक्षिण आणि उत्तर भाग, पेट्रोलिंग पॉईंट १७ए, रेजांग ला आणि रेचिन लामध्ये दोन्ही सैन्य आमने-सामने उभे ठाकले होते, हेही TASS ने म्हटले. गलवान खोऱ्यात हिंसाचार झाल्याानंतर भारताने चीनला इशारा देत आपल्या सीमेचे रक्षण करण्यासाठी भारतीय जवान सज्ज असल्याचे ठणकावले होते. गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर भारत आणि चीनमधील चीन मोठ्या प्रमाणावर वाढला होता. काही महिन्यानंतर हा तणाव निवळण्यास सुरुवात झाली. दरम्यान, भारत-चीनमध्ये सैन्य कमांडर स्तरावर चर्चेच्या ९ व्या फेरीनंतर ( ) एकमत झाले आहे. चीन आणि भारतीय सैनिक आता पाँगाँग सरोवराच्या दक्षिण आणि उत्तर किनाऱ्यावरून मागे हटत आहेत, असा दावा चीनच्या राष्ट्रीय संरक्षण मंत्रालयाने केला आहे. चिनी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने चीनच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीवरून वृत्त दिले आहे. उभय देशांच्या सैन्यात बुधवारी झालेल्या चर्चेत एकमत झाल्यानंतर चिनी सैनिक आणि भारतीय जवान दक्षिण व उत्तर पांगाँग सरोवराच्या परिसरातून मागे हटत आहेत, असा दावा ग्लोबल टाइम्सने केला आहे.