'हार्वर्ड विद्यापीठ इंग्लंडमध्ये', मुख्यमंत्री बिप्लब देब यांचं अज्ञान जगजाहीर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, February 18, 2021

'हार्वर्ड विद्यापीठ इंग्लंडमध्ये', मुख्यमंत्री बिप्लब देब यांचं अज्ञान जगजाहीर

https://ift.tt/3pzOtaq
आगरतळा : भाजप नेते आणि त्रिपुराचे बिप्लब देव यांनी ' इंग्लंडमध्ये' असल्याचं सांगत आपलं अज्ञान जगासमोर उघड केलंय. 'आपण जेव्हा कधी इंग्लंड किंवा लंडनबद्दल विचार करतो तेव्हा आपल्या नजरेसमोर पहिल्यांदा आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटीचीच प्रतिमा येते', असं वक्तव्य यांनी केलंय. त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब त्रिपुराच्या सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. इथे विद्यार्थ्यांना आणि उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केलंय. 'एक शहर किंवा स्थान आपल्या विद्यापीठाद्वारे प्रसिद्ध होऊ शकतं. जेव्हा आपण इंग्लंड किंवा लंडनबद्दल विचार करतो, तेव्हा केम्ब्रिज आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटीच आपल्या नजरेसमोर येते', असं त्यांनी म्हटलं. बिप्लब देब अनेकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी चर्चेत असतात. यावेळीही त्यांच्या अज्ञानाची सोशल मीडियावर जोरदार खिल्ली उडवली जातेय. उल्लेखनीय म्हणजे, अमेरिका स्थित आपल्या दर्जेदार उच्च शिक्षणासाठी जगप्रसिद्ध आहे. ही संस्था १६३६ साली स्थापन करण्यात आली होती.