अर्थसंकल्पातून महाराष्ट्रासाठी मोठी आनंदाची बातमी; मेट्रो प्रकल्पाला मिळणार बळ - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, February 1, 2021

अर्थसंकल्पातून महाराष्ट्रासाठी मोठी आनंदाची बातमी; मेट्रो प्रकल्पाला मिळणार बळ

https://ift.tt/3r4mjW4
नवी दिल्ली: केंद्रीय लोकसभेत सादर करण्यास सुरूवात झाली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पाचे वाचन करताना सुरूवातीलाच महाराष्ट्रासाठी एक मोठी घोषणा केली आहे. राज्यातील मेट्रो प्रकल्पाला बळ देणारी ही बातमी आहे. वाचा- अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नाशिक आणि नागपूर मेट्रोसाठी मोठी आर्थिक तरदूत जाहीर केली आहे. त्यांनी नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ५ हजार ९७६ कोटी तर नाशिक मेट्रोसाठी २ हजार ०९२ कोटीची तरतूद जाहीर केली आहे. आरोग्य क्षेत्राला संजीवनी ; प्रत्येक जिल्ह्यात होणार अत्याधुनिक लॅब आरोग्य सेवेचा दर्जा वाढवण्यासाठी सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात मोठी तरतूद केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आरोग्य सेवा क्षेत्रासाठी ६४१८० कोटींची घोषणा केली. पुढील सहा वर्षात आरोग्य सेवेचा टप्याटप्यात दर्जा सुधारला जाणार आहे. प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय स्तरातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी सरकारने सहा वर्षांची योजना तयार केली आहे, असे सीतारामन यांनी आज सांगितले. त्या म्हणाल्या की नॅशनल हेल्थ मिशनला यामुळे फायदा होईल. या योजनेत ग्रामीण भारतात १७००० आणि शहरी आणि निमशहरी भागात ११००० नवीन आरोग्य सेवा केंद्र उभारली जातील. वाचा- आरोग्य सेवा केंद्र आणि लॅब यांना एकमेकांशी जोडले जाणार आहे. देशातील प्रत्येक जिल्ह्यात अत्याधुनिक लॅब उभारन्ह्यात येईल, असे त्यांनी सांगितले. देशात सध्या दोन करोना प्रतिबंधात्मक लसीना मान्यता मिळाली आहे. लवकरच आणखी दोन करोना प्रतिबंधात्मक लशी तयार होतील, असे त्यांनी सांगितले.