अनुष्का- विराटने मुलीसोबतचा फोटो शेअर करत सांगितलं नाव - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, February 1, 2021

अनुष्का- विराटने मुलीसोबतचा फोटो शेअर करत सांगितलं नाव

https://ift.tt/3aghSRq
मुंबई- टीम इंडियाचा कर्णधार आणि यांनी आपल्या मुलीचं नाव जाहीर केलं आहे. अनुष्काने तिच्या इन्स्टाग्रामवर एका पोस्टद्वारे आपल्या मुलीचं नाव सांगितलं. विराट आणि अनुष्काने आपल्या मुलीचं नाव ठेवलं आहे. जानेवारीत विराट कोहली आणि अनुष्का आई- बाबा झाले. मुलीच्या जन्मानंतर विराट सुट्टीवर होता. पण आता तो पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर परतला आहे. भारतात होणाऱ्या मालिकेत इंग्लंडविरुद्ध चार कसोटी सामने खेळायचे आहेत. अनुष्काने विराट आणि मुलीसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत लिहिले की, 'एकमेकांवर प्रेम करत एकत्र राहू.. आमच्या प्रेमाला आणि विश्वासाला 'वामिका'च्या येण्याने एक नवीन स्थान मिळालं आहे. काही मिनिटांतच अश्रू, आनंद आणि काळजी या सर्व गोष्टी आम्ही अनुभवल्या. आम्ही आमची झोप गमावली आहे पण मन मात्र परिपूर्ण आहे. तुमच्या प्रेमाबद्दल आणि प्रार्थनेबद्दल मनापासून धन्यवाद.' दरम्यान, ११ जानेवारी रोजी विराटनं सोशल मीडियावरून मुलगी झाल्याची गोड बातमी सर्वांना सांगितली होती. बाळाची सुरक्षा आणि प्रायव्हसी जपण्यासाठी विराट आणि अनुष्कानं कॅमेरासमोर येणं टाळलं होतं. मात्र आता इतक्या दिवसांनी ते पहिल्यांद एकत्र दिसले. बाळाच्या नियमित चेकअपसाठी विरुष्का दवाखान्यात आले होते. तेव्हा काही फोटोग्राफर्संनी त्यांना कॅमेरात कैद केलं. हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दोघांनी एकत्र पोज दिल्या, तसंच मीडिया पत्रकार आणि फोटोग्राफर्स यांचेही त्यांनी आभार मानले. कोणीही फोटो काढू नये याची सक्त ताकीद एवढंच नाही तर हॉस्पिटलमधील कर्मचार्‍यांना फोटो न काढण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. हॉस्पिटलमधील सुरक्षाही आधीपेक्षा अधिक कडक करण्यात आली होती. जे लोक आजूबाजूच्या रूम्समध्ये अॅडमिट आहेत त्यांना भेटायला येणाऱ्यांना आणि इतर कर्मचाऱ्यांना मुलीची झलक दिसू नये याची खास सोय करण्यात आली होती.