
मुंबई : सोन्यामध्ये होत असलेल्या घसरणीनंतर ग्राहकांसाठी खरेदीची योग्य संधी असल्याचे कमॉडिटी विश्लेषकांचे म्हणणे आहे. शुक्रवारी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये () सोने १६३ रुपयांनी स्वस्त झाले. सोन्याचा भाव ४७३४५ रुपयांवर बंद झाला. 'एमसीएक्स'वर एक किलो ६९१८४ रुपये आहे. शुक्रवारच्या सत्रात त्यात ६९२ रुपयांची वाढ झाली होती. दरम्यान काल सोन्याचा भाव ४७१११ रुपयांपर्यंत खाली आला होता. good returns या वेबसाईटनुसार आज शनिवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६४३० रुपये झाला. २४ कॅरेट सोन्याचा भाव ४७४३० रुपये झाला. दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६३९० रुपये आहे. २४ कॅरेटसाठी तो ५०६१० रुपये झाला आहे. चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४४६५० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ४८७१० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७१३० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९८२० रुपये आहे. ऑगस्ट २०२० मध्ये मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव ५६२०० रुपयांच्या विक्रमी पातळीवर गेला होता. करोनाचे संकट आणि आर्थिक अनिश्चितता यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याचा झळाळी मिळाली होती. दरम्यान, आठवडाभरात सोने दरात मोठी घसरण झाल्याने सराफ व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यामुळे सोन्याची मागणी वाढेल, असा अंदाज सराफ व्यावसायिक व्यक्त केले आहे. दरम्यान, शुक्रवारी जागतिक कमॉडिटी बाजारात देखील सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण झाली. जागतिक बाजारात सोन्याचा भाव १८२०.७३ डॉलर झाला आहे. त्यात ०.३ टक्के घसरण झाली. यूएस गोल्ड फ्युचरमध्ये ०.३ टक्के घसरण झाली असून प्रती औंस भाव १८२१.१० डॉलर झाला. चांदीमध्ये ०.२ टक्के घसरण झाली असून प्रती औंस चांदीचा भाव २६.८९ डॉलर झाला आहे. गेल्या महिनाभरापासून जगभरात करोना लसीकरण सुरळीत सुरु आहे. त्यामुळे या जीवघेण्या साथीचा फैलाव आटोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यातच दुसऱ्या बाजुला अमेरिकेच्या महाकाय आर्थिक पॅकेजने जगभरातील भांडवली बाजारांमध्ये तेजीची लाट धडकली आहे. अमेरिका, आशिया आणि युरोपातील शेअर बाजार तेजीत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी आणि संस्थांनी सोन्यातील गुंतवणूक कमी करून ती भांडवली बाजाराकडे वळवली आहे असल्याचे जाणकारांनी सांगितले.