सलग पाचव्या दिवशी दरवाढ;पेट्रोलियम कंपन्यांची कमाई, ग्राहकांची लूट - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, February 13, 2021

सलग पाचव्या दिवशी दरवाढ;पेट्रोलियम कंपन्यांची कमाई, ग्राहकांची लूट

https://ift.tt/3agJXZX
मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी आज शनिवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ केली. आज देशभरात पेट्रोल ३० पैसे तर डिझेल ३६ पैशांनी महागले. जागतिक बाजारात कच्च्या तेलाने ६२ डॉलरची पातळी ओलांडल्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांनी दरवाढीचा सपाटा लावला आहे. एकीकडे कंपन्यांची जोरदार कमाई सुरु असून ग्राहकांची मात्र लूट सुरु असल्याचे बोलले जाते. आठवडाभरात सलग पाचव्या दिवशी आहे. आजच्या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोल ९५ रुपयांच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. तर चेन्नईत ९१ रुपयेआणि बंगळुरुत ९२ रुपयांच्या जवळपास पोहोचला आहे. आजच्या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलचा भाव ९४.९३ रुपये झाला आहे. मुंबईत एक लीटर डिझेलसाठी ग्राहकांना आता ८५.७० रुपये मोजावे लागतील. राज्यात नांदेडमध्ये ९६.८७ रुपये आहे. शुक्रवारी येथे पेट्रोल ९८.०७ रुपये झाले होते. तर परभणीमध्ये सर्वाधिक ९७.०६ रुपये आहे. परभणीत एक लिटर डिझेलचा भाव ८६.४५ रुपये आहे. दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ८८.४४ रुपये झाले आहे. डिझेलचा भाव ७८.७४ रुपये झाला आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९०.७० रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८३.९६ रुपये भाव आहे.कोलकात्यात आज पेट्रोल ८९.७३ रुपये झाले आहे. डिझेलचा भाव ८२.३३ रुपये झाला आहे. बंगळुरात पेट्रोल ९१.४० रुपये असून डिझेल ८३.४३ रुपये झाला आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींनी वर्षभराचा उच्चांकी स्तर गाठला आहे. ब्रेंट क्रूडचा भाव ६२.४३ डॉलर असून त्यात १.२९ डॉलरची वाढ झाली. तर लंडन क्रूड ऑइल एक्सचेंजमध्ये कच्च्या तेलाचा भाव १.२३ डॉलरने वधारला आणि ५९.४७ डॉलर झाला.
शहर पेट्रोल डिझेल
मुंबई ९४.९३ ८५.७०
परभणी ९७.०६ ८५.४५
नांदेड ९६.८७ ८६.२८
भारतातच इंधन महाग का - दुहेरी कर पद्धतीमुळे भारत पेट्रोल आणि डिझेल सर्वाधिक महाग आहे. आपण बघितलं तर पेट्रोलवर जवळपास १८० टक्के आणि डिझेल वर १४० टक्के कराचा भुर्दंड ग्राहकांना सोसावा लागतो. याचा अर्थ सध्या पेट्रोलच्या किमतीत जवळपास ५० रुपये हे करापोटी द्यावे लागत आहेत. डिझेलमध्ये हे प्रमाण जवळपास ४० रुपये आहे. - १ एप्रिल २०२० रोजी पेट्रोलवर ३७.८० रुपये आणि डिझेलवर २८ रुपये कर होता. - करोना काळात केंद्र सरकारने इंधनावरील उत्पादन शुल्कात वाढ केली होती. तर राज्य सरकारांनी देखील व्हॅटमध्ये वाढ केली होती. आजच्या घडीला स्थानिक करांमुळे राजस्थानमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा सर्वात महाग आहे. - १ फेब्रुवारी २०२१ रोजी पेट्रोलवरील कर ५२.९० रुपये आणि डिझेल ४३.१ रुपयांपर्यंत वाढला. - पेट्रोल आणि डिझेलमधील करवाढीमुळे सरकारला चालू वर्षात किमान ३.४६ लाख कोटींचे उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. - कच्च्या तेलाचे पेट्रोल डिझेल तयार होताना त्यात तेल वितरक कंपन्याचे मार्जिन, केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा स्थनिक कर , उत्पादन शुल्क, व्हॅल्यू ऍडेड टॅक्स (VAT), अधिभार (cess) आकारला जातो. त्यामुळे प्रत्यक्षात पेट्रोल आणि डिझेल दरातील मोठा वाटा हा कराने व्यापला आहे.