गलवान खोऱ्यात सैनिक गमावले; चीनची पहिल्यांदाच अधिकृत कबुली - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, February 19, 2021

गलवान खोऱ्यात सैनिक गमावले; चीनची पहिल्यांदाच अधिकृत कबुली

https://ift.tt/3s53Ucm
नवी दिल्ली : गेल्या वर्षी पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात भारतासोबत झालेल्या हिंसक झटापटीत चीनचे पाच सैन्य अधिकारी आणि जवानांचा मृत्यू झाला होता, अशी कबुली ''नं () शुक्रवारी पहिल्यांदाच अधिकृतरित्या दिलीय. चीनी सेनेचं अधिकृत वर्तमानपत्र 'पीएलए डेली'नं शुक्रवारी दिलेल्या एका बातमीनुसार, ''नं () काराकोरम रांगेत तैनात असलेल्या आणि जून २०२० मध्ये गलवान खोऱ्यात भारताविरुद्ध झालेल्या संघर्षात प्राण गमावलेल्या आपल्या पाच सैन्य अधिकारी-जवानांना श्रद्धांजली वाहिली'. गलवान खोऱ्यात हिंसक झडपेदरम्यान प्राण गमावणाऱ्यांत पीएलएच्या शिनजियांग सेना तुकडीचे रेजिमेन्टल कमांडर क्युई फबाओ यांचादेखील समावेश होता, असं 'ग्लोबल टाईम्स'नं 'पीएलए डेली'च्या बातमीचा हवाला देत म्हटलंय. क्यु फबाओ, चेन होंगून, जियानगॉन्ग, जिओ सियुआन आणि वांग जुओरन अशी चीनच्या शहीद झालेल्या सैनिकांची नावं आहेत. यातील चार जणांचा मृत्यू हिंसक झडपे दरम्यान झाला होता. तर एकाचा मृत्यू रेस्क्यू दरम्यान नदीत वाहून गेल्यानं झाला होता. गेल्या वर्षी जून महिन्यात गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झडपेत भारताचे २० सैनिक शहीद झाले होते. मात्र, 'पीएलए'कडून पहिल्यांदाच शहिद झालेल्या सैनिकांबद्दल अधिकृत कबुली देण्यात आलीय. उल्लेखनीय म्हणजे, पॅन्गाँग सरोवराच्या उत्तर आणि दक्षिण किनाऱ्याहून दोन्ही देशांनी आपापले जवान माघारी घेण्याची प्रक्रिया सुरू असताना चीनकडून ही कबुली देण्यात आलीय. सैन्य माघारीची प्रक्रिया सुरु झाल्यानं दोन्ही देशांतील तणावही निवळताना दिसतोय.