मोठ्या पडद्यावर दिसणार छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, February 27, 2021

मोठ्या पडद्यावर दिसणार छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा

https://ift.tt/3bNg1Ev
मुंबई- बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकचा ट्रेण्ड सुरू आहे. अनेक नावाजलेल्या व्यक्तिंच्या आयुष्यावर सिनेमे बनवण्यात आले आहेत. त्यातील काही सिनेमांना प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला. दरम्यान, अनेक सिनेमे प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत. जयललिता यांच्या आयुष्यावर आधारीत बायोपिकमध्ये कंगना राणौत मुख्य भूमिका साकारत आहे. तर लवकरच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आयुष्यावरही बायोपिक बनवण्यात येणार आहे. आता या यादीत आणखी एका थोर व्यक्तित्वाच्या नावाचा समावेश झाला आहे. बॉलिवूडमध्ये भारताच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासावर चित्रपट बनवण्यात येत आहेत. 'तान्हाजी- द अनसंग वॉरिअर' या चित्रपटानंतर क्षत्रियकुलावतंस छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर चित्रपट बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. छत्रपती शिवरायांच्या आयुष्यावर चित्रपट बनविण्याचा मानस बॉलिवूडमधील अनेक निर्माते आणि दिग्दर्शकांच्या मनात आहे.यात रितेश देशमुख, अली अब्बास जफर, रोहित शेट्टी यांसारखे निर्माते महाराजांवर चित्रपट बनवण्याचा विचार करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 'कबीर सिंग' सिनेमाचे निर्माते अश्विन वर्दे यांनीही मराठयांच्या या वीर योध्याच्या आयुष्यावर चित्रपट बनवण्याचा विचार सुरु केला आहे. इतकंच नाही तर, त्यांनी या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्यासाठी लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरची निवड केली आहे. त्यांनी या भूमिकेसाठी शाहिदला विचारणा देखील केली आहे. शाहिदला या चित्रपटाची संकल्पना प्रचंड आवडली असून त्याने या भूमिकेसाठी निर्मात्यांना लगेच होकारही कळवला आहे. सध्या, चित्रपटाशी संबंधित काही व्यवहार पूर्ण केले जात आहेत. 'पद्मावत' या चित्रपटानंतर शाहिदच्या हा दुसरा ऐतिहासिक चित्रपट असणार आहे. यापूर्वी अभिनेता शरद केळकर याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. 'तान्हाजी- द अनसंग वॉरिअर' मध्ये शरदने साकारलेल्या भूमिकेचं प्रेक्षकांकडून प्रचंड कौतुक झालं होतं. आता शाहिदच्या या आगामी सिनेमाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता दिसून येतेय. या चित्रपटाची निर्मिती लायका प्रोडक्शनद्वारे करण्यात येणार आहे. यापूर्वी अभिनेता रितेश देशमुखने राजे शिवछत्रपती यांवर बायोपिक बनवण्याची घोषणा केली होती. हा चित्रपट तीन भागात प्रदर्शित करण्यात येणार असल्याचं त्याने सांगितलं होतं.