'संयुक्त महाराष्ट्रासाठी लढलेल्या लोकांना पंतप्रधानांनी शिवी दिली' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, February 11, 2021

'संयुक्त महाराष्ट्रासाठी लढलेल्या लोकांना पंतप्रधानांनी शिवी दिली'

https://ift.tt/3a8wm6S
म. टा. प्रतिनिधी, पुणे ' करणाऱ्या लोकांची अशी हेटाळणी करणे हा स्वातंत्र्य लढ्याच्या प्रक्रियेचा अपमान आहे. स्वातंत्र्यासाठी आणि महाराष्ट्र निर्मितीसाठी लढलेल्या लोकांना पंतप्रधानांनी शिवी दिली आहे,' अशा शब्दांत प्रसिद्ध भाषातज्ज्ञ आणि राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष यांनी पंतप्रधान यांच्यावर टीका केली. 'देशाचा जन्म आंदोलनातून झाला असल्याने प्रत्येक नागरिक आंदोलनजीवी आहे,' असेही देवी म्हणाले. वाचा: 'एखाद्या निर्णयामुळे विरोध होऊ लागला की लक्ष विचलित करण्यासाठी पंतप्रधान दर वेळी नवीन टूम शोधतात. चित्रपटातून किंवा पुस्तकातून जातीचा अपमान झाला, तर लोकांच्या भावना दुखावतात. येथे तर प्रत्यक्ष पंतप्रधानांनी संसद या सर्वोच्च सभागृहातून सामान्य माणसाचा अपमान केला आहे,' अशी टीका देवी यांनी पत्रकार परिषदेत केली. वाचा: 'कष्टमय जीवन जगून जनतेला अन्न सुरक्षा देणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रश्न मानवतावादी आणि सहानुभूती विचाराने सोडवला पाहिजे. सरकारने प्रश्न योग्यरीतीने हाताळला, तर तो आंतरराष्ट्रीय होणार नाही. काही पक्ष खुल्या बाजाराची अर्थव्यवस्था स्वीकारूनही सरकारचा चेहरा मानतावादी असावा यासाठी आग्रही आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यातील दहा लाख शेतकऱ्यांची संमतीपत्रे राष्ट्रपतींना पाठवणार आहोत,' असे देवी म्हणाले. 'बारा हजार वर्षांच्या इतिहासावर प्रकाश' 'येथील प्रदेशाचा बारा हजार वर्षांचा इतिहास लिहिण्यासाठी केंद्र सरकारने समिती नेमली आहे. यातून इतिहासाचे विडंबन होण्याची शक्यता असल्याने त्याचा प्रतिवाद करण्यासाठी समांतर पातळीवर इतिहास लिहिला जात आहे. संस्कृती आणि समाजाच्या इतिहासात भारतातील वस्ती, खेडे, शेती, स्थलांतर, भाषांचा उगम, हत्यारे व अवजारे, तसेच शस्त्रांचा विकास, शहरांची रचना, राज्यांची निर्मिती, विविध विचार, धर्म, संप्रदाय, महाकाव्ये, वैज्ञानिक बदल, येथील लोकांचा दूरवरच्या प्रांतातील लोकांशी असलेला संबंध, या मुद्द्यांवर प्रकाश टाकला जाणार आहे. इसवी सन पूर्व ८००च्या मागील इतिहासाविषयी स्पष्टता येणार आहे,' असे भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी सांगितले. वाचा: