मुंबई- दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. त्याची पत्नी हिने सोमवारी सकाळी मुलाला जन्म दिला. कपिलने दुसऱ्यांदा बाबा होण्याची गोड बातमी सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. कपिल शर्मा याने ट्वीट करत म्हटलं की, 'नमस्कार, आज सकाळी देवाच्या आशीर्वादाने आम्हाला मुलगा झाला आहे. आई आणि मुलगा दोघेही निरोगी आहेत. तुमचे आशीर्वाद, प्रेम आणि प्रार्थना यासाठी तुमचे आभार.' यानंतर कपिलच्या सोशल मीडिया अकाउंटवर शुभेच्छांचा पाऊस पडू लागला. विशेष म्हणजे कपिलने काही दिवसांपूर्वी तो दुसऱ्यांदा बाबा होणार असल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. यावेळी कपिलने पत्नीच्या दुसऱ्या गरोदरपणाची बातमी लपवली होती. पण गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये गिन्नीचा बेबी बंपसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर दिसला होता. यानंतरच गिन्नी गरोदर असल्याचं चाहत्यांना कळलं होतं.