निक आणि आईच्या मागे प्रियांकाने लावले होते डिटेक्टीव्ह - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, February 12, 2021

निक आणि आईच्या मागे प्रियांकाने लावले होते डिटेक्टीव्ह

https://ift.tt/3qdC8d3
मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री सध्या तिच्या नवीन प्रकाशित झालेल्या पुस्तकामुळे प्रचंड चर्चेत आहे. तिचं पहिलं पुस्तक 'अनफिनिश्ड' यात तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. त्यात तिने अनेक मजेदार किस्सेही सांगितले आहेत जे तिच्या चाहत्यांना भलतेच पसंत पडतायत. त्यातील एक किस्सा तेव्हाचा आहे जेव्हा प्रियांकाने निक आणि तिच्या आईच्या मागे गुप्तहेर लावले होते. प्रियांकाने तिच्या लग्नाच्या आधीची आठवण सांगितली आहे. प्रियांका आणि निक जेव्हा एकमेकांना डेट करत होते तेव्हा निकने प्रियांकाच्या आईला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर प्रियंकाने सांगितलं की, निक तिच्या आईला घेऊन चक्क डेटवर गेला होता. तेव्हा निक आणि प्रियांकाला एकमेकांना डेट करून जास्त कालावधी झाला नव्हता. त्यावेळेस निकही प्रियांकाच्या कुटुंबाला पूर्णपणे ओळखत नव्हता. अशात निकने आईसोबत डेटला जाणं प्रियांकाला योग्य वाटत नव्हतं. याचं कारणामुळे प्रियांकाने त्या दोघांच्या मागे तिचे गुप्तहेर लावले होते. हे गुप्तहेर म्हणजे तिचे सुरक्षारक्षकच होते. तिने त्यांना निक आणि आईचे फोटो काढायचं काम दिलं. त्या दोघांचं नक्की काय बोलणं झालं हे ती त्या फोटोंतून 'क्वांटिको' स्टाईलने शोधून काढणार होती. निकचं प्रियांकाच्या आईला डेटवर नेण्याचं एकमेव कारण त्यांचा लग्नासाठी होकार मिळवणं होतं. निक २०१८ ला भारतात आला होता. ऑगस्ट महिन्यात त्यांचा साखरपुडा झाला आणि डिसेंबरमध्ये ते दोघं लग्न बंधनात अडकले. निक आणि प्रियांकाची जोडी चाहत्यांची आवडती जोडी आहे. प्रियांकाचा 'द व्हाईट टायगर' चित्रपट काही काळापूर्वीच प्रदर्शित झाला आहे. सद्य प्रियांका 'टेक्स्ट फॉर यू' च्या चित्रीकरणात व्यस्त आहे.