आठवतय का? मी आधीच इशारा दिला होता; भारताच्या पराभवानंतर खेळाडूचे ट्वीट - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, February 10, 2021

आठवतय का? मी आधीच इशारा दिला होता; भारताच्या पराभवानंतर खेळाडूचे ट्वीट

https://ift.tt/3aWvD8m
नवी दिल्ली: चेन्नईत झालेल्या पहिल्या कसोटीत () इंग्लंडने यजमान भारतीय संगाचा २२७ धावांनी पराभव केला. चार सामन्याच्या कसोटी मालिकेत इंग्लंड आता १-०ने आघाडीवर आहे. कर्णधार जो रुटची शानदार फलंदाजी आणि नेतृत्व यामुळे इंग्लंडला विजय मिळवता आला. त्याला सुरेख साथ दिली ती गोलंदाजांनी. वाचा- भारतीय संघाच्या या पराभवानंतर इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक केव्हिन पीटरसनने केलेले एक ट्विट जोरदार व्हायरल होत आहे. पीटरसनने हिंदीत केलेल्या या ट्विटमध्ये म्हटले आहे की, इंडिया, आठवते की मी आधीच धोक्याचा इशारा दिला होता. इतका जल्लोष करू नका. जेव्हा तुम्ही ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत केले होते. भारतीय संघाने गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियात सलग दुसऱ्यांदा कसोटी मालिकेत पराभूत केले होते. भारतीय संघ कमकूवत असताना देखील ही ऐतिहासिक कामगिरी केली होती. तेव्हा पीटरसनने ट्वीट केले होते. भारताने या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष नक्कीच करावा. कारण तो सर्व अडचणींवर मात करून मिळवला आहे. पण टीम इंडियाची खरी कसोटी येत्या काही आठवड्यात होणार आहे. ज्यांना तुम्हाला घरच्या मैदानावर पराभूत करायचे आहे. या दोन आठवड्यात अधिक जल्लोष करण्यापासून सावध रहा, असे पीटरसनने तेव्हा म्हटले होते. वाचा- भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना १३ फेब्रुवारीपासून चेन्नईतच होणार आहे. पहिल्या कसोटीतील २२७ धावांचा विजय हा इंग्लंडचा भारतातील सर्वात मोठा विजय ठरला आहे. चेन्नईतील पहिल्या कसोटीत इंग्लंडने जो रूटच्या द्विशतकाच्या जोरावर ५७८ धावा केल्या होत्या. भारताला पहिल्या डावात ३३७ धावा करता आल्या. त्यानंतर इंग्लंडने दुसऱ्या डावात १७८ धावा करून भारताला विजयासाठी ४२० धावांचे लक्ष्य दिले. पण टीम इंडिया १९२ धावात बाद झाली.