अर्थसंकल्पावर बोलणार पंतप्रधान मोदी, भाजप खासदारांना व्हीप जारी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, February 10, 2021

अर्थसंकल्पावर बोलणार पंतप्रधान मोदी, भाजप खासदारांना व्हीप जारी

https://ift.tt/36Zi7zs
नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा १५ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. संसदेत आज अर्थसंकल्पावर चर्चा होणार आहे. हेदेखील सदनात बोलणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपकडून आपल्या खासदारांना करण्यात आला आहे. यापूर्वी, मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा गुलाम नबी आझाद यांना निरोप देताना संसदेला संबोधित केलं होतं. यावेळी ते भावूक झालेले दिसले होते. लोकसभा खासदारांना व्हीप जारी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरही उत्तर देणार आहेत. यासोबतच काँग्रेस खासदार राहुल गांधीही आपलं म्हणणं संसदेसमोर मांडणार आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षानं आपल्या लोकसभा खासदारांना सदनात उपस्थित राहण्यासाठी तीन ओळींचा व्हीप जारी केलाय. राज्यसभेत अर्थसंकल्पावर चर्चा सुरू आज सर्वात अगोदर राज्यसभेत सर्वसाधारण अर्थसंकल्पावर चर्चा होणार आहेत. लोकसभेआधी राज्यसभेत अर्थसंकल्पावर चर्चा होण्याची ही सहावी वेळ आहे. सर्वसाधारणपणे अर्थसंकल्पावर लोकसभेत चर्चा होते. परंतु, १९५५, १९५९, १९६३, १९६५ आणि २००२ मध्ये लोकसभेआधी राज्यसभेत अर्थसंकल्पावर चर्चा झाल्याचं दिसून येतं. काँग्रेस खासदार जयराम रमेश यांनी सदनातील अनेक सदस्यांना अर्थसंकल्पावर बोलण्याची इच्छा असल्यानं चर्चेचा वेळ १० तासांवरून वाढवून १२ तासांचा करण्यात यावा, अशी मागणी केलीय.