अश्विनी बिद्रे हत्या: सरकारी वकिलांपुढे नवा पेच - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, February 13, 2021

अश्विनी बिद्रे हत्या: सरकारी वकिलांपुढे नवा पेच

https://ift.tt/3ai78Ds
नवी मुंबई: सहाय्यक पोलिस निरीक्षक हत्याकांडामुळे महाराष्ट्र पोलिसांची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यामुळे हे प्रकरण सध्या सर्वच स्तरांतून गांभीर्याने घेतले जात असताना काही पोलिस साक्षीदार मात्र न्यायालयात प्रश्नांची उत्तरे देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्याचा या खटल्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याने या साक्षीदारांची राज्याच्या पोलिस महासंचालकांकडे तक्रार करणार असल्याचे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रदीप घरत यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. वाचा: अश्विनी बिद्रे हत्याकांडप्रकरणी मुख्य साक्षीदारांची साक्ष संपल्यानंतर आता पनवेल जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश माधुरी आनंद यांनी अन्य साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या सुनावणीच्या वेळी एका पोलिस कर्मचाऱ्याने दोन प्रश्नांची उत्तरे दिली नव्हती. यावर विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सरकारी साक्षीदारांनी अशा पद्धतीने न्यायालयात वर्तन केल्यास त्याचा खटल्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशा पोलिस कर्मचाऱ्यांची पोलिस महासंचालकांकडे तक्रार करण्यार असल्याचे घरत यांनी स्पष्ट केले आहे. वाचा: दरम्यान, आम्हाला आवश्यक असलेली कागदपत्रे उपलब्ध होत नाहीत, असा कांगावा आरोपी पक्षाच्या वकिलांनी शुक्रवारी न्यायालयात केला. त्यामुळे खटल्याचे कामकाज झाले नाही. पुढील सुनावणी येत्या २६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. खटल्याच्या कामकाजात खोडा घालण्याचा प्रयत्न आरोपींकडून होत आहे, असा आरोप अश्विनी यांचे पती राजू गोरे यांनी केला आहे. वाचा: