पुणे: विवाहितेला ऊसाच्या रसातून गुंगीचे औषध पाजून तिच्यावर करून त्याचा व्हिडिओ नातेवाइकांना पाठवण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्यातील परिसरात घडली. या प्रकरणी पीडितेने पोलिसांत तक्रार दाखल केली असून, आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली आहे. तरुणाने विवाहितेला गुंगीचे औषध पाजून बेशुद्ध केले. तिच्यावर बलात्कार केल्यानंतर त्याचा व्हिडिओ काढला. हा व्हिडिओ महिलेच्या नातेवाइकांना पाठवला. चुलत दिरानेच हे भयानक कृत्य केले. महिलेने पोलिसांत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीनुसार, ८ फेब्रुवारीला ही घटना उघडकीस आली. २८ जानेवारी ते ८ फेब्रुवारीदरम्यान हा प्रकार घडला. चुलत दिराने ज्यूसमधून गुंगीचे औषध पाजले. बेशुद्धावस्थेत त्याने बलात्कार केला. त्यानंतर व्हिडिओ काढला. तो पती आणि नातेवाइक, मित्रांच्या मोबाइलवर पाठवून व्हायरल केला. दरम्यान, ही घटना उघडकीस आल्यानंतर महिलेने तात्काळ पोलीस ठाणे गाठून आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांकडून या घटनेचा तपास करण्यात येत आहे.