रेल्वेत स्वस्त पर्याय; 'एसी थ्री टियर इकोनॉमी क्लास' कोच - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, February 11, 2021

रेल्वेत स्वस्त पर्याय; 'एसी थ्री टियर इकोनॉमी क्लास' कोच

https://ift.tt/371Zhb2
नवी दिल्ली : भारतीय रेल्वेकडून बुधवारी पहिल्यांदाच '' कोच सादर करण्यात आला आहे. 'हा जगातील सर्वात वातानुकूलित प्रवास' असेल अशी आशा रेल्वे मंत्रालयाकडून व्यक्त करण्यात आलीय. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेचे हे डब्बे 'आर्थिकदृष्ट्या परवडणारे' असतील तसंच सद्य एसी थ्री टियर आणि शयनयान वर्ग (एसीशिवाय) या डब्ब्यांच्या मधल्या श्रेणीतील हा नवा डब्बा असेल. अर्थात, सद्य एसी थ्री टियर आणि शयनयान वर्ग (एसीशिवाय) या डब्ब्यांच्या मधल्या सुविधा या डब्यात उपलब्ध असतील. या नव्या कोचच्या डिझाईनमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. प्रवाशांच्या सुविधेसाठी काही नव्या गोष्टी डब्यात जोडण्यात आल्या आहेत. चाचणीसाठी याला रेल्वे कोच फॅक्टरी (आरसीएफ) कपूरथलाच्या डिझाईन आणि मानक संस्थेकडे पाठवण्यात आलं आहे. या कोचची कल्पना आयसीएफनं तयार केली होती. त्यानंतर ऑक्टोबर २०२० पासून या डिझाईनवर काम करण्यात येत होतं. या नव्या कोचमध्ये जास्तीत जास्त प्रवासी प्रवास करू शकतील. कारण यामध्ये बर्थची संख्या ७२ हून ८३ करण्यात आली आहे. मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, या डिझाईनमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. प्रत्येक कोचमध्ये दिव्यांग व्यक्तींच्या सुविधेसाठी शौचालयाचा दरवाजा तयार करण्यात आला आहे. डिझाईनमध्ये प्रवाशांची सुविधा लक्षात घेत अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. आता प्रत्येक बर्थवर थंड हवा मिळण्यासाठी '' लावलेले दिसतील. तर या डब्ब्यांत प्रत्येक बर्थवर स्वतंत्र दिवाही देण्यात आला आहे. त्यामुळे प्रवासी आरामात वाचू शकतात. तसेच प्रत्येक बर्थला मोबाईल चार्जिंगसाठी वेगळा पॉईंट देण्यात आला आहे.