लॉकडाउनपासून आतापर्यंत मुंबईत ५७ हजार जणांवर गुन्हे दाखल - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, February 7, 2021

लॉकडाउनपासून आतापर्यंत मुंबईत ५७ हजार जणांवर गुन्हे दाखल

https://ift.tt/3cKnm9X
म. टा. खास प्रतिनिधी, करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मार्च २०२०मध्ये लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनपासून आतापर्यंत मुंबईत ५७ हजारपेक्षा अधिक जणांवर दाखल करण्यात आले आहे. एकीकडे गृहमंत्री यांनी कायदेशीर मार्गाने दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येतील, अशी घोषणा केली असतानाच वेग मंदावला असला तरी पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे. इतकेच नाही तर गुन्ह्यांची नोंद झालेल्यांवर आरोपपत्र दाखल केली जात असल्याने सर्वांचे धाबे दणाणले आहेत. करोना विषाणूचा वाढत संसर्ग पाहता मार्च २०२०मध्ये लावण्यात आले. अचानक करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये नागरिकांची घरातच कोंडी झाली. सुरूवातीला पोलिसांना विनाकारण घराबाहेर पडू नये यासाठी जनजागृती केली, कारवाईचा धाक दाखविण्यासाठी ठिकठिकाणी संचलन केले. उठाबशा, बेडूकउड्या असेही प्रयोग करून पाहिले. परंतु नागरिकांचे सहकार्य मिळण्याऐवजी अनेक ठिकाणी पोलिसांच्या कारवाईला विरोध करण्यात आला. अखेरीस पोलिसांनी नियम मोडणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्यास सुरूवात केली. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, अत्यावश्यक वस्तू कायदा, साथीचे रोग प्रतिबंधक कायदा, सरकारी आदेशाचे उल्लंघन, जमावबंदी आदेश धुडकावणे, अफवा पसरविणे अशा विविध कायद्यांतर्गत असलेल्या कलमांद्वारे गेल्या सुमारे वर्षभरात ५७ हजार ३५० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. २५ हजार ७९९ जणांना अटक करून तर २२ हजार ६५९ जणांना नोटीस देऊन सोडण्यात आले. ८८६२ जणांवर अद्याप अटकेची कारवाई करण्यात आलेली नाही. करोनाकाळात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांमध्ये कायदेशीर प्रक्रियेनुसार पोलिसांनी आरोपपत्र दाखल करण्यास सुरूवात केली आहे. यामुळे नियमभंग करणाऱ्यांना कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावे लागत आहे. आरोपपत्र दाखल केल्यामुळे नियमभंग करणाऱ्यांवर रितसर खटला चालविला जाणार असल्याने सर्वांचे धाबे दणाणले आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हे गुन्हे मागे घेण्याची घोषणा केली असून त्याची अंमलबजावणी करावी. तसेच पोलिसांनी आता गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया बंद करावी अशी मागणी होत आहे. उत्तर मुंबई आघाडीवर नियमभंगात उत्तर मुंबई आघाडीवर असून सर्वाधिक १०,७०२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण मुंबई (६५००) असून त्यापाठोपाठ पश्चिम उपनगर (३८४८), पूर्व उपनगर (३७५१) तर सर्वात कमी २८८६ गुन्हे मध्य मुंबईत दाखल झाले आहेत. सार्वजनिक ठिकाणी गर्दीचे ११ हजार १६८ तर मास्क न वापरणाऱ्यांवर १० हजार ४७२ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. प्रकार गुन्हे करोना संदर्भात ३१४ हॉटेल ३१४ पान टपरी १३४ इतर दुकाने १५१० सार्वजनिक ठिकाणी गर्दी १११६८ अवैध वाहतूक ३०८५ मास्क न वापरणे १०४७२ इतर ६९०