IND vs ENG : जो रूटला रोखणे अशक्य; केला आणखी एक विक्रम - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, February 6, 2021

IND vs ENG : जो रूटला रोखणे अशक्य; केला आणखी एक विक्रम

https://ift.tt/36N6ueU
चेन्नई: इंग्लंडचा कर्णधार () सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. आधी श्रीलंकेविरुद्ध आणि आता भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत रुटने धमाकेदार फलंदाजी केली आहे. चेन्नईत सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत रुटने पहिल्या दिवशी शतक तर दुसऱ्या दिवशी दीड शतक पूर्ण केले. वाचा- पहिल्या दिवशी रूटने शतक झळकावले. रुटचे ही १००वी कसोटी आहे. १००व्या कसोटीत शतक करणारा तो नववा खेळाडू ठरला. त्याच बरोबर ९८, ९९ आणि १००व्या कसोटीत शतक करणारा जो रूट हा जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला होता. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रुटने दीड शतक पूर्ण केले. रुटचे कसोटी क्रिकेटमधील सलग तिसरे दीड शतक ठरले. वाचा- कसोटी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रुट आता सातव्या स्थानावर पोहोचला आहे. या यादीत श्रीलंकेचा कुमार संगकारा पहिल्या स्थानावर आहे. त्याने २००७ साली सलग चार वेळा १५० हून अधिक धावा केल्या. दुसऱ्या क्रमांकावर विली हेमंड असून त्यांनी १९२८-२९ मध्ये तीन वेळा अशी कामगिरी केली. दिग्गज फलंदाज डॉन ब्रॅडमन (१९३७), जहीर अब्बास (१९८२-८३) तर न्यूझीलंडचा टॉम लॅथम (२०१८-१९) यांनी प्रत्येकी ३ वेळी अशी कामगिरी केली आहे. वाचा- रूटने पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हकच्या विक्रमाशी बरोबरी केली. इंझमामने १००व्या कसोटीत १५० हून अधिक धावा केल्या होत्या. त्याने भारताविरुद्ध २००५ मध्ये १८४ धावा केल्या होत्या. रूटने आज या विक्रमाशी बरोबरी केली. वाचा- चेन्नईत शतक करण्याआधी श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात २२८ तर दुसऱ्या कसोटीत १८६ धावा केल्या होत्या.