पुण्याच्या गोधडीला लाभला आंतरराष्ट्रीय सन्मान - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, February 12, 2021

पुण्याच्या गोधडीला लाभला आंतरराष्ट्रीय सन्मान

https://ift.tt/3aYyFsp
पुणे: गोधडी... आई-आजीची कलाकुसर दाखविणारी...... महागड्या ब्लँकेटहून कितीतरी अधिक हवीहवीशी वाटणारी आणि हिवाळ्याचे दिवस मायेने ऊबदार करणारी...... अशा या गोधडीची म्हणजेच 'क्विल्ट'ची दखल 'इंडिया इंटरनॅशनल फेस्टिव्हल'च्या माध्यमातून घेण्यात येत आहे. यंदाचा फेस्टिव्हल नुकताच पार पडला असून, त्यामध्ये पुण्याच्या कलाकार यांनी तयार केलेल्या 'क्विल्ट'ला 'बिट्‌वीन द लाइन्स' या कंटेम्पररी विभागात विशेष उल्लेखनीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. सुजाता या स्वत: उत्कृष्ट चित्रकार असून, त्यांच्या पेटिंगची अनेक प्रदर्शने भरविण्यात आली आहेत. कृष्णधवल जलरंगांत चित्र साकारण्याची त्यांची हातोटी आहे. त्या मूळच्या नागपूरच्या असून, गेली २५ वर्षे पुण्यात वास्तव्यास आहेत. राज्यात तयार होणारी गोधडी महिलांची सर्जनशीलता आणि कलात्मक दृष्टिकोनाचे उत्तम उदाहरण असल्याचे त्या सांगतात. त्यातूनच त्यांनीही विविध प्रकारच्या गोधड्या आणि त्याआधारे वॉलपीसही तयार केले. २०१९ मध्ये चेन्नईमध्ये भरविण्यात आलेल्या पहिला इंटरनॅशनल क्विल्ट फेस्टिव्हलमध्ये सुजाता यांना ऑनलाइन पाहिला आणि यात भाग घेण्याचा निश्चय केला. जगभरातून वैविध्यपूर्ण कलाकृतींसह कलाकार यात भाग घेत असल्याने स्पर्धेत बक्षीस मिळविणे सोपे नसते. या स्पर्धेत क्विल्टच्या आकाराचे कोणतेही बंधन नसते, मात्र नावीन्य आणि सर्जनशीलता महत्त्वाची असते. कंटेम्पररी, ट्रेडिशनल, इंडियन, थीम, जनरेशन नेक्स्ट आणि मिनिएचर क्विल्ट या विभागांमध्ये ही स्पर्धा घेतली जाते; तसेच नावाजलेल्या क्विल्टर्सच्या कार्यशाळा, व्याख्यानेही आयोजित केली जातात. वाचा: यंदाच्या फेस्टिव्हलमध्ये सुमारे ३०० स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यामधून विशेष पुरस्कार मिळालेल्या आपल्या कलाकृतीविषयी सुजाता सांगतात, 'लॉकडाउनचा उपयोग सकारात्मकतेने करून घेतला. कलाकृतींसाठी, कल्पना सुचण्यासाठी अधिकाधिक वेळ मिळाला. याच काळात मी क्विल्ट तयार केले. चार फुटांचे क्विल्ट तयार करण्यासाठी सुमारे दोन महिने लागले. यासाठी मी खादीच्या कापडाचा वापर केला. थोडा मशिनचा वापर केला असून, थोडे हातानेही शिवले आहे.' सुजाता यांचा कलात्मक दृष्टिकोन त्यांच्या क्विल्टमध्येही दिसून येतो. भौमितिक आकार वापरून जणू अमूर्त चित्र साकारल्याचा भास होतो. त्यांनी वेगवेगळ्या रंगांचे दोरे आणि टाक्यांचे वेगळे प्रकार वापरले आहेत. आपल्या देशात जवळपास सगळ्याच राज्यांत गोधडी किंवा रजया तयार करण्याची परंपरा आहे. गुजरात, राजस्थान किंवा ‌उत्तरेकडील रजयांमध्ये त्या-त्या ठिकाणच्या विशिष्ट प्रकारच्या नक्षीचा वापर केल्याचे दिसून येते. महाराष्ट्रातील गोधड्यांचे वैशिष्ट्य म्हणचे मूळ रंगांचा वापर अधिक केलेला दिसतो. ही कला जोपासणे आणि पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. - सुजाता थोरात, चित्रकार आणि क्विल्टर