करोनाकाळातही केवळ २७ दिवसांत राम मंदिरासाठी 'इतका' निधी गोळा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, February 13, 2021

करोनाकाळातही केवळ २७ दिवसांत राम मंदिरासाठी 'इतका' निधी गोळा

https://ift.tt/3qiWimb
अयोध्या : उत्तर प्रदेशातील चर्चित अयोध्या राम मंदिरासाठी गेल्या महिन्यापासून देशभरात देणग्या जमा करण्यासाठी मोहीम सुरू आहे. या मोहिमेंतर्गत राम मंदिरासाठी आत्तापर्यंत १५०० कोटी रुपयांहून अधिक निधी गोळा करण्यात आल्याची माहिती '' समितीकडून देण्यात आलीय. १५ जानेवारी रोजी देशभरात देणगी मोहिमेला प्रारंभ करण्यात आला होता. ही मोहीम येत्या २७ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. 'श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्रा'चे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार गुरुवारी ११ फेब्रुवारीपर्यंत राम मंदिरासाठी १५११ कोटी रुपयांचा निधी गोळा करण्यात आला आहे. म्हणजेच, करोनाकाळातही केवळ २७ दिवसांत धार्मिक कार्यासाठी हा निधी उपलब्ध झाला आहे. या मोहिमेत विश्व हिंदू परिषदेचे जवळपास १.५ लाख कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. राम मंदिरासाठी घरोघरी जात देणग्या गोळा केल्या जात आहेत. राम मंदिर न्यासानं यासाठी भारतीय स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदामध्ये खाती उघडली आहेत. चंपत राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, भव्य राम मंदिरासाठी राबवण्यात आलेल्या या मोहिमेची सांगता २७ फेब्रुवारीला होईल. यासाठी १३ कोटींहून अधिक १० रुपयांचे, १०० रुपयांचे आणि १००० रुपयांचे कूपन रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र समितीकडून छापण्यात आले होते.