मुंबई-अहमदाबाद हायवेवर रिक्षात आढळला मृतदेह - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, February 19, 2021

मुंबई-अहमदाबाद हायवेवर रिक्षात आढळला मृतदेह

https://ift.tt/3k4nzX9
म. टा. वृत्तसेवा, पालघर: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी एका ऑटो रिक्षाचालकाचा त्याच्या रिक्षातच मृत्यू झाल्याची घटना समोर आली. मनोर पोलिसांनी याबाबत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रीय महामार्गावर मनोर मस्तान नाक्यापासून मुंबईकडे १५ किलोमीटर अंतरावरील नाका येथे बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास एका रिक्षामध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. या मृतदेहाच्या अंगावर अनेक ठिकाणी जखमा आढळून आल्या आहेत. पोलिसांनी याबाबत अधिक चौकशी केली असता वसई तालुक्यातील पुंडलिक पाटील नावाच्या व्यक्तीचा मृतदेह असल्याची ओळख पटल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी हा मृतदेह विच्छेदनासाठी पाठवला आहे. अज्ञात आरोपीवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी मनोर पोलिस ठाण्याचे पोलिस अधिक शोध घेत आहेत.