तीन दिवसांत 'एवढी' वाढली मुंबई लोकल ट्रेनमधील प्रवाशांची संख्या - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, February 5, 2021

तीन दिवसांत 'एवढी' वाढली मुंबई लोकल ट्रेनमधील प्रवाशांची संख्या

https://ift.tt/2YJwCCP
म. टा. प्रतिनिधी, मुंबई मर्यादित वेळेत सर्वांसाठी सुरू असलेल्या लोकलमधून विनामास्क प्रवाशांवर होणाऱ्या कारवाईचा वेग तिसऱ्याच दिवशी थंडावला आहे. लोकलमधील प्रवासी संख्येत रोज लाखोंची भर पडत असताना कारवाईच्या संख्येत मात्र घट नोंदवण्यात आली आहे. प्रशासनाकडून सोईने आणि दुजाभाव करत होत असलेल्या कारवाईमुळे प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे. (Number of Commuters in ) विना मास्क फिरणाऱ्या प्रवाशांवर १ फेब्रुवारीला मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील ५१५ प्रवाशांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. २ फेब्रुवारीला विनामास्क प्रवाशांची संख्या ५६० वर पोहचली. ३ फेब्रुवारीला ४१३ प्रवाशांवर कारवाई करण्यात आल्याचे मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या आकड्यांवरून स्पष्ट होते. तीन दिवसांत विनामास्क प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून एकूण २,८२,८०० रुपयांची वसूली करण्यात आली आहे. महापालिका कर्मचारी रेल्वे पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करत आहे. एसटी-बेस्टसह मरीन ड्राइव्ह, चौपाटी ही ठिकाणेही गर्दीच्या दृष्टीने संवेदनशील आहेत. तेथे ही अशी कारवाई करावी. कारवाई केवळ समान्यांवरच का, असा सवाल प्रवाशांकडून विचारण्यात येत आहे. करोना नियंत्रणात येत असल्याने सर्वांसाठी पूर्ण वेळेत लोकल सेवा सुरू व्हावी, अशी मागणी तमाम रेल्वे प्रवाशांकडून करण्यात येत होती. संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने राज्य सरकारने कार्यालयीन वेळ वगळता लोकल प्रवासाची मुभा सर्वांना दिली. तसेच प्रवासात नियमभंग करणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक आणि कारावासाची शिक्षा देणार असल्याचे स्पष्ट केले. सुरूवातीच्या तीन दिवसांत कोणत्याही प्रवाशांला कारावासाची शिक्षा सुनावण्यात आलेली नसल्याची माहिती समोर येत आहे. सर्वांना प्रवासमुभा द्या रेल्वे प्रवासी करोना संसर्गाचे नियम पाळून आणि मास्कचा वापर करून रेल्वे प्रवास करत असावा, म्हणून महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या कारवाईचा वेग मंदावला आहे. यामुळे राज्य सरकारने आता आणखी विलंब न लावता सर्व वेळेत सर्वांसाठी लोकल सुरू करणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया प्रवासी संघटनांमधून उमटत आहेत. दिनांक- मध्य रेल्वे- पश्चिम रेल्वे प्रवासी संख्या-दंड / प्रवासी संख्या-दंड ३ फेब्रुवारी - १८७-३७४०० / २२६ -३८९०० २ फेब्रुवारी - २७८-५५६०० / २८२ -४७९०० १ फेब्रुवारी - २७५-५५००० / २४० - ४८००० स्रोत - मध्य आणि पश्चिम रेल्वे