आमदाराच्या फार्महाऊसमध्ये आढळले एका वेळी चार अजगर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, February 5, 2021

आमदाराच्या फार्महाऊसमध्ये आढळले एका वेळी चार अजगर

https://ift.tt/3pQ4kCL
म. टा. वृत्तसेवा, कल्याणजवळच्या मामणोलीनजीक असलेल्या चौरे गावातील आमदार यांच्या फार्महाऊसमध्ये एकाचवेळी चार सापडल्याने खळबळ उडाली. सर्पमित्रानी तातडीने धाव घेत या चारही अजगरांना पकडले असून त्यांना वनविभागाच्या निर्देशांनुसार जंगलात सोडण्यात आले. चौरे गाव येथे आमदार गायकवाड यांचे फार्महाऊस असून दुपारच्या सुमारास या परिसरात चार अजगर कर्मचाऱ्यांना दिसले. त्यामुळे हे कामगार घाबरले. मात्र प्रसंगावधान दाखवत चंद्रकांत जोशी आणि सहकारी यांनी या चारही अजगराना रिकाम्या ड्रममध्ये भरून सर्पमित्राना बोलावून घेतले. माहिती मिळताच सर्पमित्र दत्ता बोंबे, ज्ञानेश्वर सुतार, सिद्धी गुप्ता आणि हितेश करंजवकर यांनी घटनास्थळी पोहोचत या चारही अजगराना ताब्यात घेत वनपाल एम.डी. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बाजूच्या वनखात्याच्या जगंलात नैसर्गिक आधिवासात सोडत जीवनदान दिले. हिवाळ्यात अजगर जातीच्या सापांच्या विनीचा हंगाम असतो. या काळात मादी साप फेरोमोन नावाचा गंद हवेत सोडते. या गंधाच्या मादकतेने आजूबाजूचे नर आकर्षित होऊन मादी सापाच्या अवती-भवती जमा होतात. यागोष्टीमुळे देखील हे चार अजगर एकत्र आले असावेत, असे सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी सांगितले. दरम्यान एकाच वेळी पूर्ण वाढ झालेले चार अजगर एकत्र सापडल्यानंतरही धाडस करत जोशी यांनी या चारही अजगराना बंदिस्त करून ठेवण्यासाठी दाखविलेल्या धाडसाचे कौतुक होत आहे.