'ती' कामावरून घरी परतत होती, इतक्यात तिच्याजवळ तरूण आला अन्... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, February 3, 2021

'ती' कामावरून घरी परतत होती, इतक्यात तिच्याजवळ तरूण आला अन्...

https://ift.tt/3arullf
कोलकाता: पश्चिम बंगालची राजधानी येथील उल्टाडांगा येथे एका तरुणाने महिलेवर केला. अॅसिड हल्ल्यात महिलेसह तिला वाचवण्यासाठी आलेली व्यक्तीही होरपळली आहे. दोघेही गंभीर आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी मंगळवारी या घटनेची माहिती दिली. अॅसिड हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी महिलेच्या लग्नाआधी तिचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. लॉकडाउनच्या काळात तो तिच्यासोबत पुन्हा प्रेमसंबंध ठेवण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, महिलेने त्याला टाळले. यामुळे त्याने महिलेवर अॅसिड हल्ला केला, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पीडित महिला सोमवारी कारखान्यातून काम उरकून घरी जात होती. त्याचवेळी तरुणाने तिच्यावर अॅसिड हल्ला केला. महिलेच्या सोबत असलेल्या व्यक्तीने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. यात तोही होरपळला आहे. तरुणाने हल्ला करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण स्थानिकांनी त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. हल्ल्यात जखमी झालेल्या दोघांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.