म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई बाइकची साखळी स्वच्छ करीत असताना, मुंबईतील एका ४२ वर्षीय व्यक्तीच्या डाव्या हाताचा तुटलेला अंगठा शस्त्रक्रियेद्वारे जोडण्यात डॉक्टरांना यश मिळाले आहे. मोनिका मोरे हिची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केलेल्या यांनी कॉम्प्लेक्स करून तुटलेला अंगठा पुन्हा जोडला. वाचा: विलेपार्ले येथे राहणारे रोहन हे बँकेत नोकरीला आहेत, त्यांना बाइकस्वारी करण्याची आवड आहे. बाइकची साखळी स्वच्छ करीत असताना त्यांचा डावा अंगठा अचानक दुचाकीच्या साखळीत अडकला. अडकलेला अंगठा काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांच्या अंगठ्याचा अर्धा भाग पूर्णपणे तुटला. त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारांसाठी दाखल करण्यात आले. कुटुंबीयांच्या संमतीने रोहन यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. या शस्त्रक्रियेवेळी मायक्रोस्कोपचा वापर करून डाव्या हाताचा वेगळा झालेला अंगठा पुन्हा जोडण्यात आला. वाचा: याबाबत डॉ. सतभाई म्हणाले की, अपघातात हाताच्या बोटांना दुखापत झालेले अनेक रुग्ण येत असतात. रोहन यांना अपघात झाल्यानंतर ते तातडीने रुग्णालयामध्ये उपचारासाठी आल्यामुळे तुटलेल्या बोटांना पुन्हा जोडता आले. एका आठवड्यानंतर त्यांना घरी पाठविण्यात आले. हाताच्या हाडांना स्टेनलेस स्टीलच्या वायरने जोडण्यात आले असून, अंगठ्याला रक्तपुरवठा योग्यपद्धतीने व्हावा, यासाठी रक्तवाहिन्याही जोडण्यात आल्या. हातांच्या बोटांच्या रक्तवाहिन्यांचा आकार खूपच लहान असतो. अशा स्थितीत केवळ माइक्रोस्कोपद्वारे शस्त्रक्रिया करणे फायदेशीर असते. वाचा: