मुंबई महापालिकेच्या 'या' भूमिकेला काँग्रेसचा विरोध - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, February 5, 2021

मुंबई महापालिकेच्या 'या' भूमिकेला काँग्रेसचा विरोध

https://ift.tt/3aE7YJk
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई मुंबईसाठी एकच असावे, या मुंबई पालिकेच्या भूमिकेस काँग्रेसने कडाडून विरोध दर्शविला आहे. मुंबई पालिकेच्या अर्थसंकल्पात शहरातील इतर नियोजन प्राधिकरणाऐवजी पालिकेकडून एकमेव नियोजन प्राधिकरणाचा सुरू असलेला घाट चुकीचा असून, त्यास मुंबई काँग्रेसने गुरुवारी स्पष्ट शब्दांत विरोध केला. मुंबई पालिकेने सादर केलेला अर्थसंकल्प हा शिलकी दाखवण्याच्या अनुषंगाने फुगवून दाखवला असल्याची टीका मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप यांनी केली. मुंबईत म्हाडा, एमएमआरडीए, एमसीआरडीए, मुंबई पोर्ट ट्रस्टसारखी प्राधिकरणे अस्तित्वात आहेत. त्या यंत्रणा कार्यरत असताना एकच नियोजन प्राधिकरण म्हणजे विकेंद्रीकरणाचा उद्देश असफल ठरत असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. मालमत्ता कराचा मुद्दा प्रलंबित आहे. मालमत्ता करातून हजारो कोटी रुपये येणे आहे. ही रक्कम वसूल करण्यासाठी पालिकेने प्रयत्न करावेत. मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचा प्रस्ताव पालिकेसह विधानसभा, विधान परिषदेत मंजूर झाला आहे. असे असताना नेमके आताच सर्वसाधारण कर माफ करून संभ्रम केला जात आहे. पालिकेने २०२५पर्यंत १०० टक्के मालमत्ता कर माफ करावा. तसेच ५०१ ते ७०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना ६० टक्के करमाफी द्यावी, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या राजीव गांधी भवन येथील बैठकीत पालिका अर्थसंकल्पाविषयी भाष्य करताना करण्यात आली. यावेळी मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंह सप्रा, पालिका विरोधी पक्षनेते रवी राजा, मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस भूषण पाटील, संदेश कोंडविलकर उपस्थित होते. मुंबईतील पालिकेच्या मोठ्या रुग्णालयांसह, दवाखान्यांची स्थिती फार चांगली नाही. त्यांची दुरुस्ती आणि अत्याधुनिकरण आवश्यक आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यात चर्चगेट, गिरगावसारख्या ठिकाणीही पाणी साचले. अशा ठिकाणी केवळ पंप बसवण्याचे काम केले जाणार आहे का? पालिकेने यासाठी चांगल्या योजना आखल्या पाहिजेत. तसेच, पालिका शाळांचा दर्जा वाढविला जातानाच मराठी शाळा टिकवल्या गेल्या पाहिजेत, असा आग्रह मांडताना या अर्थसंकल्पात पालिकेने सीबीएसई शाळा वाढविण्याच्या निर्णयाचे जगताप यांनी स्वागत केले. ट्वीटवर टीका दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी केलेल्या ट्वीटविषयीही जगताप यांनी नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेण्याऐवजी त्यांनी केलेले व्यक्तव्य दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. १०० दिवस, १०० विभाग मुंबई पालिकेची पुढील वर्षी होणारी निवडणूक लक्षात घेत मुंबई काँग्रेसने 'माझी मुंबई, माझी .. १०० दिवस, १०० विभाग' उपक्रम हाती घेतला आहे. त्यास शनिवार, ६ फेब्रुवारीला दुपारी ४ पासून सुरुवात होणार आहे. सायनपासून सुरू होणाऱ्या या उपक्रमातून शहरातील सगळे २२७ विभाग फिरून स्थानिकांशी संवाद साधला जाणार आहे.