
वॉशिंग्टन: वर्ष २०२१ साठी शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकन दाखल करण्याची मुदत संपली असून या यादीत अनेकांचा समावेश झाला आहे. यातील काही नावे मागील वर्षी चांगलीच चर्चेत होती. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि त्यांचे जावई जेरेड कुश्नर यांच्या नावाचाही समावेश आहे. त्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. पश्चिम आशियात शांतता चर्चेला यशस्वीपणे पूर्णरुप दिल्याने या दोघांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई आणि त्यांचे सहकारी अवी बेरकोवित्ज यांना रविवारी शांततेच्या नोबल पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले. इस्रायल आणि अरब देशांमधील संबंध मैत्रीपूर्ण करण्यासाठी त्यांना नामांकन देण्यात आले. या दोघांनी इस्रायल आणि युएई, बहरीन, सुदान आणि मोरक्को दरम्यान करार केले. इस्रायल आणि अरब देशांमध्ये मैत्री करार करण्यासाठीच डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आहे. वाचा: त्याशिवाय अमेरिकेतील मताधिकार कार्यकर्ते आणि डेमोक्रॅटीक पक्षाच्या नेत्या स्टेसी अब्राम्स यांना मतदानातून अहिंसक बदल घडवून आणण्याच्या प्रयत्नासाठी नोबेलसाठी नामांकन देण्यात आले आहे. अब्राम्स यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे मतदानाची टक्केवारी वाढली होती. त्यामुळे बायडन यांना मोठा फायदा झाला. वाचा: शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी रशियाचे विरोधी पक्ष नेते एलेक्सी नवेलनी, हवामान बदलाविरोधातील चळवळीची कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग आणि जागतिक आरोग्य संघटना यांना नामांकन देण्यात आले आहे. ट्रम्प यांचे नाव वगळता इतर नावांची शिफारस नॉर्वेच्या खासदारांनी केली. वाचा: मागील वर्षी, हा संयुक्त राष्ट्र संघाच्या वर्ल्ड फूड प्रोग्रामला जाहीर करण्यात आला. शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी जवळपास ३१८ जण स्पर्धेत होती. युद्ध-संघर्षग्रस्त भागातील शांततेसाठी परिस्थिती सुधारण्यासाठी आणि उपासमारीला रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या या वर्ल्ड फूड प्रोग्रामने मोलाची कामगिरी बजावली असल्याचे नोबेल पुरस्कार समितीने म्हटले आहे. अन्न आणि कृषी संघटनेच्या स्थापनेनंतर १९६३ मध्ये या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी जगभरातील विविध देशांमधून निधी दिला जातो. 'वर्ल्ड फूड प्रोगाम'ने २०१९ मध्ये ८८ देशांतील जवळपास १० कोटी नागरिकांपर्यंत खाद्यान्न पाठवले. जगभरातील उपासमार संपुष्टात आणण्यासाठी आणि खाद्य सुरक्षितेला प्रोत्साहन देणारी 'वर्ल्ड फूड प्रोगाम' सर्वात मोठी संघटना आहे.