
नवी दिल्ली: भारत आणि इंग्लंड () यांच्यातील कसोटी मालिकेला ५ फेब्रुवारीपासून सुरूवात होत आहे. कसोटी क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षात भारतीय संघाच्या विजयात ()चे महत्त्वाचे योगदान आहे. शानदार गोलंदाजीच्या जोरावर अश्विनने संघात स्थान भक्कम केले आहे. नुकत्याच ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत त्याने ३ सामन्यात १२ विकेट घेतल्या होत्या. चौथ्या आणि अंतिम कसोटीत तो दुखापतीमुळे खेळू शकला नाही. वाचा- ... कसोटीत भारताकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अश्विन आता चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने ७४ कसोटीत ३७७ विकेट घेतल्या आहेत. या यादीत अनिल कुंबळे ६१९ विकेटसह पहिल्या, कपिल देव ४३४ विकेटसह दुसऱ्या तर ४१७ विकेटसह तिसऱ्या स्थानावर आहेत. अश्विन फक्त गोलंदाजी नाही तर फलंदाजी देखील करू शकतो. ऑस्ट्रेलियाविरुद्धची तिसरी कसोटी त्याच्या फलंदाजीमुळे भारताला ड्रॉ करता आली. इंग्लंडचे फलंदाज अश्विन सामना कसा करतात त्यावर मालिकेचा निकाल ठरेल. वाचा- इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत अश्विनला हरभजन सिंगचा एक विक्रम मोडण्याची संधी आहे. अश्विनने कसोटीत घेतलेल्या ३७७ विकेटपैकी २५४ विकेट भारतात घेतल्या आहेत. तर हरभजनने भारतात २६५ विकेट घेतल्या आहेत. इंग्लंडविरुद्ध अश्विनने १२ विकेट घेतल्यास तो हरभजन सिंगला मागे टाकू शकतो. भारतीय भूमीवर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अश्विन दुसऱ्या क्रमांकावर येऊ शकतो. या यादीत अनिल कुंबळे अव्वल स्थानावर आहे. त्याने भारतात ३५० विकेट घेतल्या आहेत. भारतात इंग्लंडविरुद्ध ५० विकेट घेण्याासाठी अश्विनला ८ विकेटची गरज आहे. त्याने आतापर्यंत इंग्लंडविरुद्ध २७ कसोटीत ५६ विकेट घेतल्या आहेत. एका डावात ५५ धावा देत ६ विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. एका कसोटीत १६७ धावा देत १२ ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.