धक्कादायक! फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये मॉडेल तरुणीवर बलात्कार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, February 26, 2021

धक्कादायक! फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये मॉडेल तरुणीवर बलात्कार

https://ift.tt/386nrBR
नवी दिल्ली: देशाची राजधानी दिल्लीमध्ये एका मॉडेल तरुणीवर केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तरुणीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. दिल्लीच्या पोलीस ठाण्यात एका २२ वर्षीय तरुणीने तक्रार केली आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन एफआयआर दाखल केला आहे. तरुणी मॉडेलिंग करते. मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या ओळखीचा एक तरुण मुंबईवरून दिल्लीत आला होता. तरुणीची आणि त्याची जुनी ओळख होती. दिल्लीत आल्यानंतर त्याने खान मार्केटमध्ये तरुणीला भेटण्यासाठी बोलावले. तेथून एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये घेऊन गेला. तेथे त्याने बलात्कार केला. इतकेच नाही तर त्याने तरुणीला धमकावले. या घटनेनंतर तरुणीने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. तिने पोलिसांना आपबीती सांगितली. तो तरूण आपले वडील आणि नातेवाइकांसोबत दिल्लीत आला होता. त्याने हॉटेलात वेगळी खोली बुक केली. तिथे केला. तक्रारीनुसार, मुलीने सांगितले की, ३० जानेवारी रोजी आरोपीने तिला मेसेज केला होता. एका लग्न सोहळ्यासाठी दिल्लीत येणार असून, त्यावेळी भेटतो असे तो म्हणाला होता. २० फेब्रुवारी रोजी पहाटे पाच वाजता आरोपीने मेसेज केला आणि आपल्या मित्राच्या घरी भेटण्यासाठी बोलावले. मात्र, त्यावेळी तरुणीने त्याला भेटण्यास नकार दिला होता. त्यानंतर खान मार्केटमध्ये दोघे भेटले. त्यानंतर तिला हॉटेलमध्ये घेऊन गेला होता. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, तरुणीच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल केला आहे. या घटनेचा तपास केला जात आहे.