चार वर्षाचा मुलगा कॉन्सर्टमध्ये गाणं गायला; कोर्टाने वडिलांना ठोठावला दंड - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, February 13, 2021

चार वर्षाचा मुलगा कॉन्सर्टमध्ये गाणं गायला; कोर्टाने वडिलांना ठोठावला दंड

https://ift.tt/3jWB6QF
बर्लिन: लहान मुलाने एखाद्या कॉन्सर्टमध्ये गाणे गायले की त्यांच्या कुटुंबीयांना मोठा आनंद होतो. मात्र, एका वडिलांना आपल्या चार वर्षाच्या मुलाने कॉन्सर्टमध्ये गायलेले गाणे महागात पडले आहे. वडिलांना कोर्टाने तीन हजार युरो इतका (जवळपास २ लाख ६४ हजार रुपये ) दंड ठोठावला. या मुलाचे वडील एंजेलो केली हे जर्मनीचे प्रसिद्ध लोक गायक आहेत. स्थानिक कोर्टाने बालश्रमाच्या आरोपाखाली हा दंड ठोठावला. ते अनेक ठिकाणी स्टेज परर्फोमन्स करतात. त्याशिवाय लाइव्ह कॉन्सर्टमध्येही सहभागी होतात. एंजेलो केली यांनी त्यांच्या चार वर्षाच्या विलियमसह २०१९ मध्ये एका कॉन्सर्टमध्ये गाणे गायले होते. विलियम हा केली यांच्या पाच मुलांमधील सर्वात छोटा मुलगा आहे. डीपीए या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, कॉन्सर्टमध्ये विलियम जवळपास अर्धा तास उभा होता. त्याशिवाय त्याने वाद्य वाजवले आणि गाणं गायले. जर्मनीमध्ये ३ ते ६ वर्षापर्यंतच्या मुलांबाबत कठोर कायदे आहेत. वाचा: जर्मनीतील कायद्यानुसार, तीन ते सहा वर्षांच्या आतील मुले एका दिवसात सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान दोन तास संगीताच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. मात्र, त्यासाठी त्यांना परवानगी घ्यावी लागते. डीपीएने दिलेल्या बातमीनुसार, अधिकाऱ्यांनी सांगितले की, विलियम रात्री ८ वाजून २० मिनिटांपर्यंत मंचावर होता. केलीचे वकील जुलियन एकरमॅनने कोर्टाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. एका कॉन्सर्टमध्ये आई-वडिलांच्या उपस्थितीत मुलगा काही वेळेसाठी मंचावर उपस्थित राहत असेल तर हे बाल मजुरीचे प्रकरण आहे, असे समजले जाऊ शकत नाही.