पेट्रोल-डिझेल महागले; तीन दिवसांनंतर पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा झटका - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, February 27, 2021

पेट्रोल-डिझेल महागले; तीन दिवसांनंतर पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा झटका

https://ift.tt/3dNPslf
मुंबई : सलग तीन दिवस इंधन दर स्थिर ठेवणाऱ्या पेट्रोलियम कंपन्यांनी आज शनिवारी पुन्हा दरवाढ केली. जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण होत आहे. मात्र आज कंपन्यांनी देशांतर्गत इंधन दरात वाढ केली आहे. आज पेट्रोल २४ पैसे आणि डिझेल १७ पैशांनी महागले. चालू महिन्यात १४ दिवसात पेट्रोल ४.०१ रुपयांनी महागले आहे. तर डिझेलमध्ये याच महिन्यात ७.६० रुपयांची वाढ झाली. भोपाळमध्ये डिझेलचा देशभरातील सर्वाधिक दर आहे. आज शनिवारी मुंबईत पेट्रोल ९७.५७ रुपये झाला आहे. मुंबईत एक लीटर ८८.६० रुपये झाला आहे. राज्यात परभणीमध्ये पेट्रोलचा भाव सर्वाधिक आहे. दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ९१.१९ रुपये आहे. डिझेलचा भाव ८१.४७ रुपये आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९३.१७ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८६.४५ रुपये भाव आहे. कोलकात्यात आज पेट्रोल ९१.३५ रुपये झाले आहे. डिझेलचा भाव ८४.३५ रुपये झाला आहे. बंगळुरात पेट्रोल ९४.२२ रुपये असून डिझेल ८६.३७ रुपये झाला आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये आतापर्यंतचा डिझेलचा सर्वाधिक ८९.७६ रुपयांचा विक्रमी दर आहे. भोपाळमध्ये आज पेट्रोलचा दर ९९.२१ रुपये आहे. अमेरिकेतील कच्च्या तेलाचा साठा १९ फेब्रुवारीच्या आठवड्यात १.०२६ दशलक्ष बॅरल होता. हिमवादळामुळे तेथील तेल साठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. टेक्सासमध्ये तेलाच्या उत्पादनात घसरण झाली होती. परिणामी तेलाचा भाव वधारला होता.अमेरिकेत तेलाच्या उत्पादनात झालेल्या घसरणीने पुरवठ्यावर परिणाम झाला होता. शुक्रवारी ब्रेंट क्रूडचा भाव ०.७५ डॉलरने घसरला आणि तो प्रती बॅरल ६६.१३ डॉलर इतका झाला आहे. तर कच्च्या तेलाचा भाव २.०३ डॉलरने घसरला आणि तो ६१.५० डॉलर झाला.