Explained शेअर बाजार कोसळला! जाणून घेऊया 'बुल' आणि 'बेअर मार्केट'ची स्थिती - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, February 27, 2021

Explained शेअर बाजार कोसळला! जाणून घेऊया 'बुल' आणि 'बेअर मार्केट'ची स्थिती

https://ift.tt/3bNwHLQ
मुंबई : हर्षद मेहताच्या आयुष्यावर चित्रीत लोकप्रिय वेब सिरीज तुम्ही पाहिली असेल तर त्यातील त्याच्या एक्सचेंजच्या पहिल्या दिवशी भुषण भट्‌ट ‘मंदोदिया’ (बेअर) आणि ‘तेजदिया’ (बुल) समजवून सांगताना दिसतो. त्यामुळे याबद्दल आणखी काहीही न सांगता, एवढेच म्हणता येईल की, ही बाजारातील सर्वात मूलभूत क्रिया आहे. संबंधित ट्रेंडनुसार, गुंतवणूकदार व ट्रेडर्सना पोझिशन घ्यायला याद्वारे मदत होते. पण हे नमके काय आहे. ही यंत्रणा कशी चालते ते पाहुया. सर्वात आधी व्यवसाय चक्र समजून घेऊ: काही ठराविक आर्थिक तत्त्वांनुसार, कोणतीही बाजारपेठ वृद्धींगत होत असते. यापैकी सर्वात महत्त्वाचे तत्त्व म्हणजे व्यवसाय चक्र (‘बिझनेस सायकल). यालाच इकोनॉमिक सायकल किंवा ट्रेड सायकल असेही म्हणतात. या वर्तुळांचा लाटांसारखा पॅटर्न असतो. दीर्घकालीन वृद्धीच्या ट्रेंडनुसार, त्यांचे स्वरुप ठरते. बाजाराची स्थिती बदलते, तसे नावानुसार, ते अपस्विंग (वृद्धी) आणि डाऊनस्विंग (घसरण) भोवती फिरते. याचप्रमाणे या बिझनेस सायकलचा कालावधीदेखील वृद्धी आणि घसरणीनुसार ठरत असतो. खरं म्हणजे, ही वृद्धी आणि घसरण बाजारासाठी नेहमीचीच आहे. बाजारात कोणतीही तांत्रिक मंदी न दर्शवता एक दिवस, एक आठवडा किंवा महिना भरात हा चढ-उतार होतोच. तर दुसऱ्या बाजूला, दीर्घकालीन वृद्धीच्या प्रक्रियेचे ते सह उत्पादन आहे. ज्यात अर्थव्यवस्था कमीत कमी दोन चतुर्थांशांनी (दर ३ महिन्यांत) घसरते, असे मत फिनॉलॉजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रांजल कामरा यांनी व्यक्त केले. बुल आणि बेअर मार्केट काय आहे ते पाहुयात: बुल मार्केट: बुल मार्केट म्हणजे अशी स्थिती, जिथे आर्थिक बाजारपेठ वाढते व भविष्यात तशी अपेक्षा ठेवते. बुल हा शब्द वास्तविक जगातील बुल या शब्दाकडून आला आहे व तो नेहमीच वरील बाजूने मार्गक्रमण करत असतो. हे त्याच्या बेसलाइनला (आर्थिक क्रियांच्या सुरुवातीच्या काळात) किंवा चक्राच्या तळाशी (खालील टोकाशी) सुरु होते. बाजार मजबूत असेल आणि पुढील शक्यता फायदेशीर असतात, तेव्हा बुल मार्केट स्थिती येते. यातून गुंतवणुकदारांचा आत्मविश्वास वाढत जातो, ज्यात जास्त लोकांना खरेदी करायची असते व कमी लोकांना विक्री करायची असते. बेअर मार्केट: बेअर मार्केट ही बुल मार्केटच्या अगदी उलट स्थिती आहे. वित्तीय बाजारात शेअरचे मूल्य घसरत असते आणि आणखी घसरण्याची चिन्हे असतात. ही बाजार सुधारणेची स्थिती असते. बुल मार्केटप्रमाणेच बिअर हा शब्ददेखील बेअर (अस्वल) या शब्दातून आला असून तो खालील बाजूने मुसंडी मारत असतो. बाजारात साठलेपणा (मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाल्यास) आल्याने वृद्धीची शक्यता कमी असते, तेव्हा ही स्थिती उद्भवते. बुलरनच्या उच्चांकी स्थितीनंतर बेअर मार्केटची स्थिती येते, ती अगदी बाजाराचा तळ गाठेपर्यंत टिकते. अशा वेळेला, अनेक जणांना स्टॉक्स खरेदी करण्याऐवजी विकायचे असतात. गुंतवणुकदारांचा आत्मविश्वास कमजोर होतो. ताजे उदाहरण द्यायचे झाल्यास, साथीच्या पूर्वी अशी विचित्र स्थिती आली होती. यात बहुतांश गुंतवणूकदारांना बाहेर पडायचे होते. कारण या साथीला कसे तोंड द्यायचे, हे कुणालाच माहिती नव्हते. बुल आणि बेअर मार्केटबद्दल, आपण अनेक गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. दिवस, आठवडा, महिना किंवा दीर्घकालीन स्थितीत हे संकेत कसे ओळखायचे, हे समजले पाहिजे. अशा संकल्पना सखोलपणे समजवून सांगणाऱ्या पुस्तकांतून अभ्यास करता येतो. तुम्ही ट्रेडिंगची कला शिकली तर बेअर मार्केटमध्येही तुम्ही नफा कमावू शकता तसेच बुल-रनमध्ये जास्तीत जास्त परतावे मिळवू शकता.