पत्रकार मनदीप पुनियाला २५ हजारांच्या जातमुचक्यावर जामीन मंजूर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, February 3, 2021

पत्रकार मनदीप पुनियाला २५ हजारांच्या जातमुचक्यावर जामीन मंजूर

https://ift.tt/3tgrYKR
नवी दिल्ली : स्वतंत्र पत्रकार यांना दिल्लीच्या रोहिणी कोर्टानं मंगळवारी केला आहे. मनदीप यांना कोर्टानं २५ हजार रुपयांच्या खासगी जातमुचक्यावर जामीन दिला. 'जामीन हा नियम आहे तर तुरुंगवास हा अपवाद आहे' या वाक्याचा वापरही मनदीप यांना जामीन मंजूर करताना न्यायालयानं केला. मनदीप पुनिया यांना सिंघु सीमेवर आंदोलन स्थळावरून अटक करण्यात आली होती. मनदीप पुनिया केंद्र सरकारनं लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनस्थळी उपस्थित होते. पुनिया यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम १८६, ३५३ आणि ३३२ यांसहित वेगवेगळ्या कलमांनुसार एफआयआर दाखल करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना आंदोलनस्थळावरून अटक करण्यात आली होती. सिंघू सिमेवर पोलीस एसएचओंशी (स्टेशन हाऊस अधिकारी) हुज्जत घालण्याचा आणि त्यांच्याशी गैरवर्तवणूक करण्याचा आरोप करत पुनिया यांच्यासोबत आणखीन एक धर्मेंद्र सिंह यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. नंतर पोलिसांनी धर्मेंद्र यांना सोडून दिलं परंतु, पुनिया यांच्याविरुद्ध आरोप दाखल करण्यात आले. सिंघू सीमेवर वार्तांकन करताना पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतलं होतं. मनदीप पुनिया यांना पोलीस ताब्यात घेताना एक व्हिडिओही समोर आला होता. यामध्ये मोठ्या संख्येत पोलीस पुनिया यांना घेरताना आणि त्यांना घेऊन जाताना दिसत आहेत. पोलिसांनी ताब्यात घेण्यापूर्वी पुनिया यांनी सिंघु सीमेवर झालेल्या हिंसेसंबंधी फेसबुकवर एक लाईव्ह व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये त्यांनी, स्वत:ला स्थानिक सांगत शेतकरी आंदोलकांवर पोलिसांच्या उपस्थितीत दगडफेक करणाऱ्या गर्दीचं वार्तांकन केलं होतं. 'मनदीप लवकरच बाहेर येतील, हे जाणून आनंद झाला. मनदीपसाठी एवढ्या मोठ्या संख्येत लोकांनी आपला आवाज उंचावला, यासाठी मी स्वत:ला भाग्यशाली समजते' अशी प्रतिक्रिया मनदीप यांची पत्नी लीना यांनी दिली.