
म. टा. विशेष प्रतिनिधी, लॉकडाउन शिथील झाल्यानंतर राज्य सरकारने रात्री एक वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र माहीम पोलिसांनी राज्य सरकारचे हे परिपत्रक मिळाले नसल्याचा दावा करत दादर, माहीम भागातील हॉटेल रात्री ११ वाजताच बंद करण्याची सक्ती सुरू केली आहे. त्यामुळे या वेळापत्रकावरून आणि हॉटेलमालकांमध्ये खटके उडू लागले आहेत. लॉकडाउन अंशत: शिथील केल्यानंतर दुकाने व आस्थापना सकाळी नऊ ते रात्री नऊ आणि हॉटेल रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास राज्य सरकार आणि पालिकेतर्फे परवानगी देण्यात आली होती. मे-जूननंतर मुंबईत करोनासंसर्ग नियंत्रणात आल्यानंतर वाचा: दुकाने, हॉटेल आणि इतर व्यावसायिक आस्थापना अधिक वेळ खुली करण्याच्या वेळांमध्ये वाढ करण्यात आली. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली या महानगर प्राधिकरणाच्या हद्दीतील दुकाने व आस्थापना रात्री ११ वाजेपर्यंत तर हॉटेल रात्री एक वाजेपर्यंत खुली ठेवण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. या आदेशाचे परिपत्रक सरकार आणि पालिकेने प्रसिद्ध केले असून मुंबईत सर्वत्र त्याची अंमलबजावणी सुरू आहे. माहीम पोलिसांनी अशा प्रकारचे परिपत्रक आपणास मिळाले नसल्याचा दावा करत हॉटेल रात्री ११ वाजताच बंद करण्याचा लकडा मालकांमागे लावला आहे. याबाबतचे परिपत्रक दाखवल्यानंतरही पोलिस ऐकत नसल्याने दादर, माहीममधील हॉटेल रात्री अकरानंतर बंद करावी लागत असल्याची तक्रार दादर, माहीम परिसरातील हॉटेलमालकांनी केली आहे. पोलिस रात्री अकरा वाजताच दारात येऊन उभे राहत असल्याने ग्राहक भीतीने दहा वाजल्यानंतर येण्यास कचरू लागली आहेत, असे मालकांचे म्हणणे आहे. वाचा: याबाबत माहीम पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास शिंदे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी या प्रकरणी योग्य ती माहिती घेऊन कार्यवाही करू, असे सांगितले. नियमावलीनंतरही जाच कायम दुकाने आणि हॉटेलांची वेळ वाढवली असली तरी कर्मचारी संख्या, सुरक्षित अंतर, मास्क, सॅनिटायझर यासह विविध प्रकारच्या अटी कायम ठेवण्यात आल्या आहेत, अशी माहिती सरकारने परिपत्रकात नमूद केली आहे. या नियमावलीचे पालन केल्यानंतरही पोलिसांचा जाच संपत नसल्याने हॉटेलमालक हवालदिल झाले आहेत. वाचा: