भिवंडीत गोदाम कोसळले; ७-८ मजूर ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, February 1, 2021

भिवंडीत गोदाम कोसळले; ७-८ मजूर ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

https://ift.tt/3pFOx9m
ठाणे: भिवंडीतील परिसरातील हरीहर कम्पाउंडमधील . आज सकाळी १०.२५ वाजता ही दुर्घटना घडली. ढिगाऱ्याखाली सात ते आठ मजूर अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच, केंद्रातून अग्निशमनचे तीन बंब घटनास्थळी पोहोचले आहेत. मानकोलीमधील हरीहर कम्पाउंड येथील प्लॉट क्रमांक ए - ८ येथील तळ अधिक एक मजली गोदाम आज, सोमवारी सकाळी १०.२५ वाजता कोसळले. ढिगाऱ्याखाली तेथे काम करणारे सात ते आठ मजूर अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. भिवंडी अग्निशमन केंद्रातून तीन बंब घटनास्थळी पोहोचले असून, बचावकार्य हाती घेतले आहे. याशिवाय, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, ठाणे अग्निशमन केंद्र आणि ठाणे आपत्ती प्रतिसाद पथकाला (टीडीआरएफ) मदत आणि बचावकार्यासाठी रवाना करण्यात आले आहे. एनडीआरएफ पथकालाही पाचारण करण्यात आले आहे.