सलमान खान म्हणाला- व्हॅलेन्टाइन डेशी माझं काही घेणं-देणं नाही - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, February 6, 2021

सलमान खान म्हणाला- व्हॅलेन्टाइन डेशी माझं काही घेणं-देणं नाही

https://ift.tt/3pQECho
मुंबई : बॉलिवूडचा दबंग खान म्हणजे अभिनेता सलमान खानचं आजवर अनेक अभिनेत्रींशी नाव जोडलं गेलं. त्याच्या कथित गर्लफ्रेंड्सची यादी तर फार मोठी आहे. पण भाईजान लग्न कधी करणार? हे उत्तर अजूनही कोणाकडे नाही. सलमानला देखील हा प्रश्न विचारला की तो गंमतीशीर याचं उत्तर देतो. आताही असंच काहीसं सलमानने केलं आहे. नुकतंच एका कार्यक्रमादरम्यान सलमानला त्याच्या व्हॅलेन्टाईन प्लॅनबद्दल विचारण्यात आलं तेव्हा माझा या दिवसाशी काही संबंध नाही असं तो हसत म्हणाला. सलमानने व्हॅलेन्टाइनबाबत दिलं मजेशीर उत्तर व्हॅलेन्टाइन डेनिमित्त तू काही खास प्लॅन केलं आहेस का? असं सलमानला विचारण्यात आल्यावर तो म्हणाला, ‘लक्ष देऊन ऐका...व्हॅलेन्टाइन डेशी माझा काय संबंध? माझं याच्याशी काहीही घेणं-देणं नाही. पण तुम्हाला व्हॅलेन्टाइन डेच्या खूप खूप शुभेच्छा.’ सलमानचं हे उत्तर ऐकताच सारे जण हसू लागले. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगला व्हायरल होताना दिसत आहे. सलमानचं लव्ह लाईफ नेहमीच चर्चेचा विषय ठरत आलंय. ऐश्वर्या राय बच्चनपासून ते अगदी कतरिना कैफपर्यंत बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींना सलमान डेट करत असल्याच्या बऱ्याच चर्चा रंगल्या. मात्र सलमान त्याच्या रिलेशनशिप तसेच खाजगी आयुष्याबाबत कधीच खुलेपणाने बोलताना दिसत नाही. आणि सध्यातरी बिझी शेड्युलमुळे व्हॅलेन्टाइन डे साजरा करण्यास सलमानला वेळ देखील नसल्याचं दिसत आहे. सध्यातरी सलमानच्या हाती बरेच बिग बजेच चित्रपट आहेत. ‘टायगर’ चित्रपटाच्या तिसऱ्या भागाच्या चित्रीकरणाला तो लवकरच सुरुवात करणार आहे. त्याचबरोबरीने शाहरुख खान स्टारर ‘पठाण’ चित्रपटातही सलमान पाहुणा कलाकार म्हणून झळकणार आहे.