Video: 'रिअल हिरो' म्हणत शाहरुख खाननं केलं शेतकऱ्यांचं कौतुक - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, February 6, 2021

Video: 'रिअल हिरो' म्हणत शाहरुख खाननं केलं शेतकऱ्यांचं कौतुक

https://ift.tt/2Mvt5G3
मुंबई: देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून सध्या बॉलिवूडमध्ये दोन गट पडलेले दिसून येत. पॉप स्टार रिहानानं याबाबत ट्वीट केल्यानंतर काही बॉलिवूड कलाकारांनी या आंदोलनात शेतकऱ्यांना समर्थन दिलं आहे. तर काहींनी याला भारताच्या विरोधात चुकीचा प्रचार केला जात असल्याचं म्हणत देशाच्या भूमिकेला आपला पाठिंबा दर्शवला आहे. ज्यात अक्षय कुमार, अजय देवगण यांसारख्या सेलिब्रेटींचा समावेश आहे. त्यानंतर आता अभिनेता शाहरुख खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात तो शेतकऱ्यांचं कौतुक करताना दिसत आहे. शाहरुखनं शेतकऱ्यांना म्हटलं 'रिअल हिरो' सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये शाहरुख म्हणतो, सर्व शेतकरी आपले भाऊ-बहीण आहेत. तुम्ही सर्वजण रिअल हिरो आहात. मी नेहमीच दिल्ली आणि मुंबईमध्ये राहिल्यामुळे मला गावाच्या बाबत जास्त काहीच माहिती नाही. पण मी समजू शकतो की, तुम्ही सर्वजण खूप मेहनत करता. ऊन किंवा पावसाचा विचार न करता शेती करता. पण कधी कधी यात नैसर्गिक आपत्ती येतात. ज्यामुळे तुमचं खूप नुकसान देखील होतं. कधी खूप पाऊस पडतो तर कधी दुष्काळ. अशा वेळी शेतीसाठी पाण्याची समस्या उद्भवते. तुम्ही रिअल हिरो यासाठी आहात कारण ज्यावर तुमची रोजी-रोटी अवलंबून आहे, ज्यामुळे आम्हाला रोजचं अन्न मिळतं. जर तेच तुम्हाला मिळालं नाही तर तुम्ही ते सुद्धा म्हणजे शेतीसाठी आवश्यक असेलेल्या पाण्याचे स्रोत सुद्धा तुम्ही स्वतःच निर्माण करू शकता. त्यामुळेच तुम्ही खरे हिरो आहात. शेतकरी आंदोलनाबाबत शाहरुखनं अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यानं सोशल मीडियावर कोणतंही ट्वीट किंवा पोस्ट शेअर केलंलं नाही. मात्र सोशल मीडियावर शाहरुखचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख शेतकऱ्यांचं कौतुक करताना दिसत आहे. मात्र हा व्हिडीओ आताचा नसून २०१७ मधील वॉटर कॅप अवॉर्ड सोहळ्यातील आहे. हा व्हिडीओ सध्या शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्याशी जोडून शेअर केला जात आहे. हा अवॉर्ड सोहळा पाणी फाऊंडेशननं आयोजित केला होता. ज्यात शाहरुखनं स्पीच दिलं होतं. दरम्यान शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर शाहरुखनं अद्याप मौन बाळगलं आहे. मात्र याआधी शेतकऱ्यांना रिअल हिरो म्हणणारा शाहरुख आता शांत का असा सवाल अनेक युझर्सनी केला आहे.