मुंबई: अभिनेता यांचं काल ९ फेब्रुवारीला वयाच्या ५८ व्या वर्षी निधन झालं. राजीव कपूर हे राज कपूर यांचे सर्वात लहान मुलगा होते. ८०च्या दशकात त्यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं. पण त्यांना 'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटानं त्यांना लोकप्रियता मिळवून दिली होती. या चित्रपटात राजीव यांचे मित्र यांनीही काम केलं होतं. राजीव यांच्या निधनानंतर बॉम्बे टाइम्सशी बोलताना रझा मुराद यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. राजीव कपूर यांच्याबद्दल बोलतना रझा मुराद म्हणाले, 'आम्ही दोघं एकमेकांना ४० वर्षांपेक्षा जास्त काळापासून एकमेकांना ओळखत होतो. मी पहिल्यांदा त्यांच्यासोबत १९८० मध्ये राहुल रवैल यांच्या 'गुनेहगार' या चित्रपटात काम केलं होतं. राजीव या चित्रपटासाठी राहुल यांचे असिस्टंट म्हणून काम करत होते. राज कपूर यांचा मुलगा असूनही या गोष्टीचा त्यांनी कधीच गर्व केला नाही. ते सर्वांशी सन्मानपूर्वक बोलत असत. सेटवरील लोकांमध्ये ते खूप सहजपणे मिसळून जात. १९८२ मध्ये जेव्हा आम्ही 'प्रेम रोग' चित्रपटाचं शूटिंग करत होतो. त्यावेळी मी त्यांना सेटवरील लोकांसोबत बसून जेवताना, साफसफाई करताना आणि सेटवरच झोपून गेलेलं पाहिलं होतं. राज कपूर यांनी त्यांना सामान्य व्यक्ती सारखं राहणं शिकवलं होतं.' प्रत्येक टेकनंतर माफी मागायचे राजीव कपूर चित्रपट 'राम तेरी गंगा मैली'च्या आठवणींना उजाळा देताना रझा मुराद म्हणाले, 'मी चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली होती आणि ते या चित्रटाचे नायक होते. क्लायमॅक्स सीनमध्ये ते मला मारणार होते. प्रत्येक शॉटनंतर ते माझ्याकडे यायचे आणि माफी मागायचे, 'सॉरी रझा साहेब तुम्हाला लागलं तर नाही. मला हा सीन करताना खूप वाईट वाटत आहे. कारण मी तुमचा खूप सन्मान करतो.' आम्ही सर्वजण सेटवर एका कुटुंबाप्रमाणे राहत असू. एकमेकांची मस्करी करत असू.' रझा मुराद यांनी राजीव यांच्यासोबत 'नाग नागिन' और 'हिना' या चित्रपटांमध्ये काम केलं होतं. 'प्रेम रोग' चित्रपटाच्या शूटिंगच्या आठवणींना उजाळा देताना ते म्हणाले, 'शूटिंगच्या वेळी हे राजीव कपूर यांना खूप ओरडायचे. राजीव त्यावेळी चित्रपटाचे असिस्टंट होते. तर ऋषी कपूर त्या चित्रपटाचे नायक. ते अनेकदा रागात राजीव कपूर यांना ओरडायचे. पण राजीव कपूर त्यांना उलटून बोलत नसत. लहान भाऊ म्हणून ते मोठ्या भावाचा पूर्ण सन्मान करत असत. पण जेव्हा आम्ही दोघं बोलत असू त्यावेळी ते मला सांगयचे रझा भाई, घरात लहान असणं सर्वात मोठा गुन्हा आहे. सर्वात मोठं पाप आहे. देव कोणालाही घरात सर्वात लहान बनवू नये.'