सारा अली खानची आईला वाढदिवसानिमित्त खास भेट; दिलं 'हे' वचन - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, February 10, 2021

सारा अली खानची आईला वाढदिवसानिमित्त खास भेट; दिलं 'हे' वचन

https://ift.tt/3q6xNIT
मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री ही अभिनेत्री आणि अभिनेता सैफ अली खान यांची मुलगी आहे. सारा तिच्या वडिलांपेक्षा तिच्या आईच्या जास्त जवळ आहे. या गोष्टीचा खुलासा तिने अनेकदा मुलाखतीत केला आहे. आता आई अमृताच्या वाढदिवशी साराने या गोष्टीचा पुन्हा उल्लेख केला. साराने ती लग्नानंतरही तिच्या आईजवळच राहणार असल्याचं म्हटलं आहे. सारा सोशल मीडियावर सक्रिय असते. ती तिचे नवनवीन फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिची दिनश्चर्यादेखील ती तिच्या चाहत्यांना सांगत असते. आई अमृताच्या जन्मदिनीही तिने पुन्हा एक फोटो शेअर करत त्यासोबत भावुक मेसेज लिहिला आहे. माझी आई माझी संपूर्ण दुनिया आहे असं म्हणत तिने लिहिलं, 'माझ्या दुनियेला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, माझा आरसा, माझी ताकद आणि माझी प्रेरणा बनल्याबद्दल मी तुझे आभार मानते. मी तुझ्यावर खूप प्रेम करते आई.' सारा आणि अमृता एकमेकांच्या अत्यंत जवळ आहेत. त्या एकमेकांसोबत राहणं जास्त पसंत करतात. तिची आईचं तिची चांगली मैत्रीण असल्याचं सारा नेहमी सांगते. त्यादोघीतला ऋणानुबंध कधीही न तुटणारा असल्याचंदेखील साराचं म्हणणं आहे. त्या दोघी सोबतचं फिरायला जातात. सारा तिच्या आईसोबतचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते.एका मुलाखतीमध्ये साराने म्हटले होते की, तिला तिच्या आईसोबत संपूर्ण आयुष्य काढायचं आहे. साराने म्हटलं, 'आयुष्यभर मला माझ्या आईसोबत राहायचं आहे. जेव्हाही मी माझ्या आईसोबत बोलते तिला माझी काळजी वाटायला लागते, कारण तिला माझ्या लग्नाची चिंता असते. पण मी लग्नानंतरही माझ्या आईसोबतचं राहणार आहे.'