
मुंबई: भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून आता बॉलिवूड स्टार्समध्ये चांगलीच जुंपली आहे. पॉप स्टार रिहानानं या संदर्भात ट्वीट केल्यानंतर जगाचं लक्ष देशात सुरू असेलेल्या शेतकरी आंदोलनाकडे वेधलं गेलं. अनेक परदेशी सेलिब्रेटींनी यावर भाष्य केलं आहे. त्यांचा हा अंदाज काही बॉलिवूड सेलिब्रेटींना पसंत आला तर काहींनी मात्र हा भारताविरुद्ध चुकीचा प्रचार करण्याचा प्रयत्न आहे असं म्हणत सरकारला समर्थन दिलं. आता यावर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानं देखील याबाबत परदेशी सेलिब्रेटींची बाजू घेतली आहे. सोनाक्षीनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात लिहिलं आहे, ‘रिहाना, ग्रेटा आणि अन्य बाहेरील व्यक्ती जे आज भारततील शेतकरी आंदोलनाविषयी बोलत आहेत त्यांना काही सुनावण्याआधी तुम्हाला हे जाणून घेण्याची गरज आहे. मान्य आहे की, त्यांना आपल्या देशातील नव्या तीन कृषी कायद्यांविषयी किंवा त्यातीत तरतूदींविषयी काहीही माहित नाही. पण केवळ हाच चिंतेचा विषय नाही. पण त्यांनी मानवी अधिकारांच्या उल्लंघनाविरोधात आवाज उठवला आहे. फ्री इंटरनेट बंद करण्याबाबत आवाज उठवला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत, सरकारचा प्रपोगेंडा, तिरस्कारयुक्त भाषण आणि सत्तेचा दुरुपयोगयाबाबत त्यांनी आवाज उठवला आहे.’ सोनाक्षीनं तिच्या स्टोरीमध्ये पुढे लिहिलं, ‘जेव्हा पत्रकार आणि मीडियाशी संबंधीत लोकांना जेव्हा तुम्ही हा विचार करण्यास भाग पाडता की, बाहेरचे लोक आपल्या देशातील कार्यप्रणालीवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. तेव्हा तुम्ही हे सुद्धा लक्षात ठेवायला हवं ही एक कोणतंही युद्ध नाही तर ही सुद्धा आपल्यासारखीच माणसं जी दुसऱ्या माणसांसाठी आवाज उठवत आहेत.’ भारतात सुरू असलेलं हे सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरलं आहे. आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहानानं याबाबत ट्वीट करताच जगभरातून या आंदोलनाला पाठिंबा मिळायला सुरुवात झाली. पण काही बॉलिवूड सेलिब्रेटींनी मात्र तिचा विरोध करत सरकारच्या भूमिकेला पाठिंबा दिला होता. अभिनेत्री तर सर्वात आधी रिहानाच्या ट्वीटवर आपली प्रतिक्रिया दिली होती. ज्यात तिनं रिहानाला मूर्ख असं संबोधलं होतं. तर इतर बॉलिवूड स्टार्सनी सर्वांना एकजूटीनं राहण्याचं आवाहन करत रिहाना किंवा भारताबाहेरील ज्यांची याबाबत प्रतिक्रिया दिली होती तो देशाच्या विरोधात एक खोटा प्रपोगेंडा असल्याचं म्हटलं होतं.