
चेन्नई: इंग्लंडच्या भारत दौऱ्याला आजपासून सुरूवात होत आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना आज (५ फेब्रुवारी)पासून चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर सुरू होईल. चार सामन्यांच्या या मालिकेतील पहिल्या दोन लढती याच मैदानावर होणार आहेत. या मैदानावर भारतीय संघाची कसोटी आणि इंग्लंडविरुद्धची कामगीर शानदार आहे. त्यामुळे भारताचे पारडे जड मानले जात आहे. LIVE अपडेट ( )>> भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकला, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय >> जो रुटची १००वी कसोटी >> जसप्रीत बुमराह भारतात प्रथमच कसोटी सामना खेळणार >> दुखापतीमुळे अक्षर पटेल पहिल्या कसोटीत खेळू शकणार नाही >>