ड्रेसला प्राईज टॅग लावूनच घराबाहेर पडली अभिनेत्री, Viral Video - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, February 20, 2021

ड्रेसला प्राईज टॅग लावूनच घराबाहेर पडली अभिनेत्री, Viral Video

https://ift.tt/3dpHSgq
मुंबई- बॉलिवूड कलाकार त्यांच्या कपड्यांमुळे नेहमी ट्रोल होत असतात. आता '' च्या घरातून नुकतीच बाहेर पडलेली अभिनेत्री कपड्यांवरून ट्रोल झाली आहे. जास्मिन तिच्या स्टायलिश लूकसाठी ओळखली जाते. पारंपरिक कपड्यांपासून ते पाश्चिमात्य कपड्यांमध्येही ती सुंदर दिसते. ती 'बिग बॉस १४' चा स्पर्धक याला पाठिंबा देण्यासाठी कार्यक्रमात गेली होती आणि आता ती पुन्हा घराबाहेर आली आहे. काही दिवसांपूर्वी जास्मिन तिच्या घराबाहेर सुंदर ड्रेसमध्ये दिसली आणि त्याच वेळेस ती ट्रोल झाली. जास्मिन तिच्या कपड्यांवरून नाही तर, कपड्यांना लटकत असलेल्या किमतीच्या टॅगमुळे ट्रोल झाली आहे. एका व्हिडीओ काढणाऱ्या व्यक्तीने तिला विचारले, तुला काय वाटतं 'बिग बॉस १४' कोण जिंकेल? त्यावर जास्मिनने म्हटले, 'सगळ्यांनीच उत्तम खेळ खेळला आहे, सगळ्यांनीच मेहनत घेतली आहे. पण मला वाटतं की, अलीने हा खेळ जिंकावा.' असं म्हणत जास्मिन तिथून निघून गेली. परंतु, तिने परिधान केलेल्या ड्रेसवर किमतीचा टॅग लटकत असल्याचं त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. या गोष्टीची किंचितही जाणीव नसलेली जास्मिन तिथून निघून जाते. या व्हिडिओदरम्यान जास्मिनला 'बिग बॉस १४' च्या ग्रॅण्ड फिनालेच्या दिवशी ती सादर करणार असलेल्या खास नृत्याबद्दलही विचारणा करण्यात आली. त्यावर ते एक सरप्राईज असल्याचं सांगत जास्मिन तिथून निघून जाते. जास्मिन 'बिग बॉस' च्या घरात असताना अली आणि तिच्यात कायम भांडणं होतं होती. अली आणि राखीच्या भांडणात जास्मिनने राखीवर कमेंटदेखील केली होती तेव्हा अलीने तिला हटकले होते.