
म. टा. विशेष प्रतिनिधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि 'सामना'च्या संपादक यांची २३ मार्चला कोविड -१९ संसर्ग चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर मंगळवारी त्यांना दक्षिण मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या डॉक्टरांच्या निगराणीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वाचा: अलिकडेच रश्मी ठाकरे यांना करोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली होती. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यानंतर रश्मी ठाकरे यांनाही करोनाची लागण झाली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलिकडेच जे. जे. रुग्णालयात जाऊन लस घेतली होती. त्यांच्यासोबत रश्मी ठाकरे यांनीही करोनाची लस टोचून घेतली होती. वाचा: