भारत-पाकिस्तानमध्ये व्यापार पुन्हा सुरू होणार? इम्रान खान घेणार आज निर्णय - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, March 31, 2021

भारत-पाकिस्तानमध्ये व्यापार पुन्हा सुरू होणार? इम्रान खान घेणार आज निर्णय

https://ift.tt/3cEq3cO
इस्लामाबाद: आर्थिक संकटाच्या खाईत असलेला देश आणि वाढत्या महागाईचे संकट आणि मरणासन्न अवस्थेत असलेल्या उद्योगांना वाचवण्यासाठी पाकिस्तान सरकार पुन्हा एकदा भारतासोबत व्यापार सुरू करण्याची शक्यता आहे. त्याशिवाय, दोन्ही देशांमधील तणाव निवळण्याचे प्रयत्न सुरू असून भारतासोबतचे संबंध सुधरवण्यासाठीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरू शकते. भारतासोबत पुन्हा व्यापार सुरू करण्यास पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आज मंजुरी देऊ शकतात अशी माहिती सुत्रांनी दिली. पाकिस्तानच्या आर्थिक मुद्यांविषयी असलेल्या कॅबिनेटची बैठक बुधवारी पार पडणार आहे. यामध्ये भारताकडून साखर आणि कापसाची निर्यात करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. याआधी भारताने ऑगस्ट २०१९ मध्ये जम्मू-काश्मीरला दिलेला विशेष राज्याचा दर्जा संपुष्टात आणला. त्यानंतर पाकिस्तानने भारतासोबतचे संबंध तोडले होते. पाकिस्तानमध्ये साखरेचा तुटवडा निर्माण झाला असून वस्त्रोद्योगही संकटात आहे. अशावेळी पाकिस्तान भारताकडून साखर आणि कापूस आयात करणार आहे. वाचा: दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिले होते. जम्मू-काश्मीरसह दोन्ही देशांमध्ये प्रलंबित असेलल्या अनेक मुद्यांवर तोडगा काढण्यासाठी परिणामकारक चर्चेसाठी अनुकूल वातावरण निर्मिती आवश्यक असल्याचे म्हटले होते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील आठवड्यात पाकिस्तान दिवसाच्या निमित्ताने इम्रान खान यांना शुभेच्छा देणारे पत्र लिहिले होते. त्या पत्राला उत्तर देताना इम्रान खान यांनी पत्र लिहिले. वाचा: वाचा: पंतप्रधान मोदी यांनी आपल्या पत्रात म्हटले होते की, पाकिस्तानसोबतचे संबंध चांगले सौहार्दपूर्ण असावे असे भारताला वाटते. मात्र, त्यासाठी विश्वासाचे वातावरण, दहशतवाद आणि द्वेषमुक्त वातावरणाची आवश्यकता आहे.