नागपूर: कौटुंबिक कलहातून पत्नीचा पती, सासूवर हल्ला - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, March 29, 2021

नागपूर: कौटुंबिक कलहातून पत्नीचा पती, सासूवर हल्ला

https://ift.tt/2P8Ra6S
: कौटुंबिक कलहातून पत्नीने नातेवाइकांच्या मदतीने पती व सासूवर हल्ला केला. ही खळबळजनक घटना कपिलनगरमधील संयोगनगर येथे घडली. प्रमित युवराज वालमंडे (वय ३२) व त्याची आई अशी जखमींची नावे आहेत. कपिलनगर पोलिसांनी प्रमितची पत्नी स्नेहा वालमंडे, विनोद कवडुजी बागडे, कल्पना विनोद बागडे, राहुल विनोद बागडे, प्रियंका, चंचल अजय ठाकूर, बाप्या ऊर्फ दुर्गेश रत्नाकर टिटे, मंदिल रामकृष्ण सवाईथूल या आठजणांविरुद्ध गैरकायद्याची मंडळी जमवून हल्ला केल्याचा गुन्हा दाखल केला. स्नेहा व प्रमितमध्ये वाद सुरू आहे. स्नेहाच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रमितविरुद्ध हुंडा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. ७ मार्चला स्नेहा व तिचे नातेवाईक प्रमितच्या घरात घुसले. त्यांच्याकडे शस्त्रे होती. नातेवाइकांनी प्रमित व त्याच्या आईला मारहाण केली.