इंधन स्वस्त ; सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोलियम कंपन्यांचा सुखद धक्का - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, March 25, 2021

इंधन स्वस्त ; सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोलियम कंपन्यांचा सुखद धक्का

https://ift.tt/3rk8FxZ
मुंबई : फेब्रुवारीत तब्बल १६ वेळा झालेल्या दरवाढीनंतर पेट्रोलने काही शहरात शंभरी ओलांडली होती. जागतिक कमॉडिटी बाजारातील कच्च्या तेलातील महागाईचे कारण त्यावेळी केंद्र सरकारने दिले होते. मात्र चौफेर टीकेनंतर अखेर पेट्रोलियम कंपन्या नरमल्या आहेत. क्रूड ऑइलचा भाव कमी झाल्याचे आज गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात कपात केली आहे आज देशभरात पेट्रोल २१ पैसे आणि डिझेल २० पैशांनी स्वस्त झाले आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. त्यामुळे इंधन दरवाढीचा मुद्दा डोकेदुखी ठरू नये म्हणून कंपन्यांनी इंधन दर कमी केल्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. काल बुधवारी कंपन्यांनी पेट्रोलमध्ये १८ पैसे आणि डिझेलमध्ये १७ पैशांची कपात केली होती. दोन दिवस झालेल्या दर कपातीनंतर पेट्रोल ३९ पैसे तर डिझेल ३७ पैसे स्वस्त झाले आहे.त्यामुळे ग्राहकांना किंचित दिलासा मिळाला आहे. आजच्या दर कपातीने मुंबईत पेट्रोलचा भाव ९७.१९ रुपये झाला आहे. तर डिझेलचा भाव ८८.२० रुपये झाला आहे. दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ९०.७८ रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ८१.१० रुपये झाला आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९२.७७ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८६.१० रुपये भाव आहे. आज गुरुवारी कोलकात्यात पेट्रोलचा भाव ९०.९८ रुपये झाले आहे. डिझेलचा भाव ८३.९८ रुपये झाला आहे. बंगळुरात पेट्रोल ९३.८२ रुपये असून डिझेल ८५.७४ रुपये झाला आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये आतापर्यंतचा डिझेलचा सर्वाधिक ८९.३७ रुपयांचा विक्रमी दर आहे. तर पेट्रोल दर ९८.८१ रुपये आहे. युरोपात करोनाची दुसरी लाट धडकल्याचे सध्या चित्र आहे. तेथील करोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने काही देशांनी लॉकडाउनचा मार्ग पत्करला आहे. त्यामुळे पुन्हा तेलाची मागणी कमी होईल, या भीतीने साठेबाजांनी तेलाची विक्री केली आहे. यामुळे मागील आठवडाभरात कच्च्या तेलाच्या किमतीत १५ टक्के घसरण झाली आहे. बुधवारी तेलाचा भाव ४ टक्क्यांनी कमी झाला. वेस्ट टेक्ससध्ये डब्ल्युटीआय क्रूडचा भाव ४.३ टक्क्यांनी कमी होऊन ५८.४७ डॉलर प्रती बॅरल झाला. तर ब्रेंट क्रूडचा भाव २.५६ डॉलरने कमी झाला आणि तो ६१.४१ डॉलरपर्यंत खाली आला आहे.