२० लाख रुपये घेऊन ती तरूणी मुंबईला जात होती; रेल्वे स्टेशनवर पोहोचली अन्... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, March 18, 2021

२० लाख रुपये घेऊन ती तरूणी मुंबईला जात होती; रेल्वे स्टेशनवर पोहोचली अन्...

https://ift.tt/3cBUGy0
जबलपूर: मध्य प्रदेशातील पोलिसांनी पुन्हा एकदा हवाला रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. क्राइम ब्रांचच्या पथकाने मदन महल पोलिसांच्या मदतीने एका तरुणीला अटक केली आहे. तिच्याकडून २० लाखांची रोकड जप्त केली आहे. ही तरुणी रोकड घेऊन जबलपूरहून मुंबईला जात होती. मदन महल पोलीस ठाण्याचे प्रभारी नीरज वर्मा यांच्या माहितीनुसार, खबऱ्यांकडून माहिती मिळाली की, एक महिला, जिच्या हातात काळ्या रंगाची बॅग आहे, त्यात हवाल्याचे पैसे आहेत. या माहितीच्या आधारे क्राइम ब्रांच पथक आणि मदन महल पोलिसांनी संयुक्त कारवाई करताना, सापळा रचून मदन महल रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ३ वरून संबंधित तरुणीला ताब्यात घेतले. झडती घेतली असता, तिच्याकडे २० लाखांची रोकड सापडली. मिळालेल्या माहितीनुसार, बाबू गोस्वामी नावाच्या व्यक्तीने नंदनी गोस्वामीला २० लाख रुपये दिले होते. ती व्यक्ती काही महिन्यांपूर्वी हवाला उद्योगात सामील होती. त्याला पोलिसांनी अटक केली होती. नंदनी गोस्वामीची मोठी बहीण मुस्कान ही देखील हवाला उद्योगात सामील असल्याचे समजते. तिला अलीकडेच रेल्वे पोलिसांनी लाखोंच्या रोकडसह अटक केली होती.