रत्नागिरी: रत्नागिरीतील लोटे एमआयडीसीमधील घरडा केमिकल कंपनीमध्ये आज शनिवारी सकाळी भीषण स्फोट झाले. या स्फोटात एकूण सहा कामगार मृत्युमुखी पडले आहेत. हे सर्वजण स्फोटानंतर लागलेल्या आगीत गंभीररित्या भाजले. त्यांना तातडीने उपचारासाठी नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. हा स्फोट कशामुळे झाला याबाबत अद्याप नेमके कारण समजू शकलेले नाही. ( at in in ) स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. या स्फोटानंतर लागलेल्या आगीत सुमारे ४० ते ५० कामगार अडकले होते, अशी माहिती मिळत आहे. मात्र त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. या स्फोटात जखमी झालेल्या इतर कामगारांना जवळच्या कळबणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घरडा कंपनीतील बॉयलर अतिशय गरम होऊन अचानक स्फोट झाले असे प्राथमिक माहिती सांगण्यात येत आहे.