
म.टा. प्रतिनिधी, खड्या आवाजातील भारदस्त संवादाने सगळ्यांची मने जिंकून घेणारा शॉटगन आज एकदम हळवा झाला. आयुष्यात मुलीचे महत्त्व किती आहे, आम्हाला मुलगी व्हावी म्हणून आम्ही कशी प्रार्थना करीत होतो याचा किस्सा त्याने ऐकविला, तेव्हा सभागृह 'खामोश' झाले. ( on ) महिला दिनाच्या निमित्ताने श्रमिक पत्रकार संघ, प्रेसक्लब आणि टिळक पत्रकार ट्रस्टच्या माध्यमातून आज कर्तृत्त्ववान महिला पत्रकारांचा सिन्हा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ' भाषणाच्या प्रारंभीच त्यांनी मी आज ' मन की बात' करणार असल्याचे सांगितले, लगेच सुधारणा करीत, ' ते दुसऱ्याचे पेटेंट आहे, मी ' दिल की बात करेन' असे म्हणत त्यांनी भाषणास प्रारंभ केला. प्रत्येकाच्या आयुष्यात आईचे, मुलीचे महत्त्व असते, 'आई रिटायर्ड होतेय' या नाटकातून ते आम्हास खूप शिकवून गेले. सगळे सुटी घेतात, आईला कुठे सुट्टी असते ? हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. आम्हाला पहिल्यांदा जुळे झाले, दोन्ही मुले होती. मुलगी व्हावी म्हणून अक्षरश: प्रार्थना केली. मुलगी घरातले चैतन्य असते. मुली नासा, इस्त्रो पर्यंत गेल्या आहेत. समाजाने त्यांना बळ द्यावे, आणखी पुढे जाण्यासाठी पाठिंबा द्यावा.' वाचा: प्रसिध्द सिने निर्माते पहेलाज निहलानी, आयकर आयुक्त रुबी श्रीवास्तव, संपादक सर्वमित्रा सुरजन यांनी यावेळी महिला दिनाचे महत्त्व विशद केले. ज्येष्ठ समर्पित कार्यकर्ता पुरस्कार उषा मिश्रा यांना तर हा पुरस्कार सरीता कौशिक यांना प्रदान करण्यात आला. महिला पत्रकार मेघना देशपांडे, कल्पना नळस्कर, मिनाक्षी हेडाऊ आणि डॉ. सीमा पांडे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र यांनी, संचलन वर्षा बासू यांनी केले तर जोसेफ राव यांनी आभार व्यक्त केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार एस. एन. विनोद, माजी आमदार आशीष देशमुख उपस्थित होते. वाचा: