दहशतवादाविरोधात भारत, चीन आणि पाकिस्तान करणार एकत्रित सराव - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, March 22, 2021

दहशतवादाविरोधात भारत, चीन आणि पाकिस्तान करणार एकत्रित सराव

https://ift.tt/2Qnhydb
बीजिंग: भारत, पाकिस्तान आणि चीन एकत्रित सराव करणार आहे. या तीन देशांसह शांघाई सहकार्य परिषद संघटनेतील (एसईओ) सदस्य देशही या सरावात सहभागी होणार आहेत. हा सराव 'पब्बी-अॅण्टी टेरर-२०२१' या नावाने होणार असून दहशतवादी कारवायांविरोधात असणार आहे. ताश्कंदमध्ये १८ मार्च रोजी क्षेत्रीय दहशतवादविरोधी परिषदेची (आरएटीएस) ३६ वी बैठक पार पडली. एससीओतील सदस्य देशांच्या प्रतिनिधींनी दहशतवाद, फुटीरतावादाविरोधात लढण्यासाठी २०२२-२४ मधील कार्यक्रमाच्या मसुद्याला मंजुरी दिली. चीनची सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने दिलेल्या वृ्त्तानुसार, दहशतवादी कारवायांना होणाऱ्या आर्थिक मदतीचा स्रोत ओळखणे आणि त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सदस्य देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये सहकार्य वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाचा: वाचा: शिन्हुआच्या वृत्तानुसार, भारत, कझाकिस्ताम, चीन, किर्गीज प्रजासत्ताक, पाकिस्तान, रशिया, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान आदी देशांच्या अधिकाऱ्यांनी या बैठकीत सहभाग घेतला होता. आरएटीएसचे मुख्य कार्यालय ताश्कंदमध्ये आहे. आरटीएस हे एससीओचा महत्त्वाचा भाग आहे. यामध्ये दहशतवाद, फुटीरतावादविरोधात सदस्य देशांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी काम केले जाते.